महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana Patole : सरकार न्यायव्यवस्था, संविधानापेक्षा मोठे आहे का?; नाना पटोले यांचा सवाल

मंत्रिमंडळाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) न्यायप्रविष्ठ असताना मंत्रिमंडळ विस्तार होत आहे यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शनिवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथ घेतात. रविवारी विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाते. त्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहे. त्यामुळे हे सरकार न्यायव्यवस्था, संविधानापेक्षा मोठ आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Nana Patole
नाना पटोले

By

Published : Aug 8, 2022, 10:50 PM IST

नागपूर -मंत्रिमंडळाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. शनिवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथ घेतात. रविवारी विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाते. त्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहे. त्यामुळे हे सरकार न्यायव्यवस्था संविधानापेक्षा मोठ आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी उपस्थित केला आहे. ते नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.


ऑगस्ट क्रांती दिनापासून ( August Revolution Day ) सेवाग्राम आश्रमातून ( Sevagram Ashram Wardha ) आझादी क्या अमृत महोत्सवाचा ( Azadi Kya Amrit Mahotsav ) पदयात्रेला सुरवात होत आहे. या निमित्याने राज्यभरात राज्यातील सर्वच महसूल विभागात जाणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र नंतरच्या काळात काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत या पदयात्रेच्या माध्यमातून पोहोचवणार आहे तसेच मागील आठ वर्षात केंद्रात मोदी सरकार आल्यापासून ज्या पद्धतीने वाताहात देशाची झाली आहे ही परिस्थिती सुद्धा जनतेपुढे मांडणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी सांगितले.

हेही वाचा -August Revolution Day : भारत छोडोचा पहिला नारा सेवाग्रामच्या बैठकीत

विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला? विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळावे, यासाठी महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) घटक पक्षासोबत चर्चा करणार आहे. विधान परिषदेत उपसभापती हे पद शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे तीन पक्षाला वाटप म्हणून विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळावे. यासाठी सर्वांशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत.

हेही वाचा -Chimur Revolution:"चिमुर क्रांतीत 21 क्रांतिकारकांना फाशी; वाचा चिमुर क्रांतीचा रक्तरंजीत इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details