नागपूर - मनसेकडून (MNS) होत असलेले हनुमान चालीसा पठन (Hanuman Chalisa Recitation) म्हणजे भक्तीचे बाजारीकरण करण्याचे काम सुरू आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हनुमान चालीसा पठनवर बोलताना भाजपवरही (BJP) जोरदार हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चढवला आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भोंगा वाजवायचा (Loudspeakers) असेल तर महागाईच्या विरोधात वाजवा, बेरोजगारीच्या विरोधात वाजवा, गरिबी आणि शेतकर्यांच्या प्रश्नाबद्दल वाजवा, असाही सल्ला पटोले यांनी दिला.
धार्मिक तेढ निर्माण करून ज्या पद्धतीने द्वेष निर्माण करण्याचे काम भाजपने केला आहे. आज हनुमान चालीसा पठन करणे निश्चितपणे चुकीचे नाही. पण एक दिवस हनुमान चालीसा वाचून ज्या पद्धतीचा प्रदर्शन करून बाजारीकरण करण्याचा प्रयत्न आहे ते चुकीचा आहे. मी पण रोज हनुमान चालीसा वाचतो, पण त्याचे प्रदर्शन करत नाही, असेही टोला पटोले यांनी लगावला.
कोल्हापूरमधून भाजपाच्या केंद्र सरकारचा निषेध - फुले, शाहू महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, कोल्हापूरच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने धर्माच्या नावावर मत मागण्याचा प्रयत्न केला आहे. महागाई असो बेरोजगारी असो की शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. देशाला आर्थिक खाईत घालण्याचे काम हे भाजप सरकारने केले आहे. या सगळ्या विषयातुन लक्ष भटकवण्याचे कोल्हापूरच्या भूमीत करण्यात आले. मात्र, पुरोगामी महाराष्ट्राने कोल्हापूरमधून एक संदेश केंद्राच्या भाजप सरकारला दिलेला आहे. कोल्हापुरातून पोट निवडणुकीच्या निकालात जयश्री जाधव या चांगल्या मतांनी निवडून येताना दिसत आहे असेही नाना पटोले यांनी दिले.