नागपूर - ममता बॅनर्जींचा संकल्प देश विकणार्यांचा साथ देणारा होता, तर सामनातून मांडलेली भूमिका देशहिताची आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सदर मत व्यक्त केले.
हेही वाचा -Nagpur Fight against Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
सामनातून मांडलेली भूमिका सत्ता टिकवण्यासाठी नाही
राजकीय पक्षांनी कुणाबरोबर राहायचे आता ते त्यांना ठरवावे लागणार आहे. भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांनी देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू केले. चीन अरुणाचलमध्ये अतिक्रमण करून बसला आहे. दुसरीकडे रोज देशाची संपत्ती विकाल्या जात आहे. संविधान पायदळी तुडवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे, ममता बॅनर्जी यांनी जी भूमिका मांडली होती ती एक प्रकारे देश विकणार्यांची साथ देणारी आहे. सामनाच्या अग्रलेखातून जे मांडले गेले ते देशहित लक्षात घेऊन मांडण्यात आलेले आहे. सत्ता टिकवण्यासाठी ती भूमिका मांडलेली नाही, असे नाना पटोले म्हणालेत. काँग्रेसला सोबत घेतल्या शिवाय किंवा काँग्रेसला दूर करणे चुकीचे, यावर पटोले यांनी सामानाचे कौतूक केले आणि ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या टीकेला एकप्रकारे समर्थन दिले.
विधानसभेचे अध्यक्ष पद हे विदर्भाकडे येईल का?