महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana patole on raj thackeray : केंद्राचे अपयश लपवण्यासाठी राज्यात धर्मांध वाद निर्माण करण्याचे काम - नाना पटोले - Nana patole news nagpur

केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी हे ( Nana patole on raj Thackeray ) सगळे राज्यात सुरू आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात ( Nana patole news nagpur ) महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. या सगळ्यांवरून लक्ष दूर करण्यासाठी धर्मांध वाद निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana patole on raj thackeray Aurangabad rally ) यांनी 'ईटीव्ही भारत'च्या विशेष मुलाखतीत बोलताना केली.

Nana patole comment on raj thackeray rally in aurangabad
Nana patole comment on raj thackeray rally in aurangabad

By

Published : May 2, 2022, 1:53 PM IST

Updated : May 2, 2022, 2:27 PM IST

नागपूर - केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी हे ( Nana patole on raj Thackeray ) सगळे राज्यात सुरू आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात ( Nana patole news nagpur ) महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. या सगळ्यांवरून लक्ष दूर करण्यासाठी धर्मांध वाद निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'ईटीव्ही भारत'च्या विशेष मुलाखतीत बोलताना केली. भाजपवर जोरदार निशाणा साधत फडणवीस यांच्या प्रश्नालाही पटोले ( Nana patole on raj thackeray Aurangabad rally ) यांनी उत्तर दिले.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

हेही वाचा -बुटीबोरी येथील बारदाना गोदामाला आग, लाखोंचे नुकसान

कायद्यापेक्षा कुणीही मोठे नसते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई झाली आहे. महाराष्ट्रात कुठेही धर्मांध उद्रेक होणार नाही, याची काळजी शासनाच्या वतीने घेतली जात आहे. पण, कोणी कायदा हातात घेत असेल, तर निश्चितपणे कायदेशीर करवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस पक्षाची असल्याचे नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस पक्ष हा जोडण्याचे काम करतो. सुईपासून रॉकेट पर्यंत उभे करण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. धर्माच्या नावाने क्रेडिट घेण्याचे काम केले जात आहे. भगवान श्री रामाचे मंदिर व्हावे यासाठी दिवंगत राजीव गांधी यांनी त्या काळात पंतप्रधान असताना भूमिपूजन केले. रामलला मंदिराला कुलूप लावले होते, ते उघडून दर्शन घेण्याचे काम केले. पण अलीकडच्या काळात आम्हीच धर्माचे ठेकेदार आहोत, असे दाखवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे, देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. हे थांबले गेले पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचे नाना पटोले म्हणालेत.

राज ठाकरे यांच्या सभेत मोठा आवाज होता, नॉर्म्सचा भंग झाला. सुप्रीम कोर्टाचे निर्देश जसे धर्माला आहे तसेच ते राजकीय पक्षाला पण आहेत. जे कोणी राजकीय पक्ष नियमापलीकडे जाऊन भोंगे वाजवत असतील त्यावर करवाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. राज्यात सध्या हायप्रोफाईल सभा घेण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या पैशाने भाजप हाय प्रोफाईल सभा घेत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या सभेला धरून केला.

हेही वाचा -VIDEO : नागपुरात कामगार कायद्या विरोधात कामगार सेनेचे आंदोलन

Last Updated : May 2, 2022, 2:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details