महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana Patole on Dhananjay Munde : लोकशाही आहे पण काहींना दिवसा स्वप्न पडतात.. मुख्यमंत्री पदावरून पटोलेंचा धनंजय मुंडेंना टोला - राष्ट्रवादी मुख्यमंत्री धनंजय मुंडे विधान

आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ( Nana Patole on Dhananjay Munde ) असेल, असे वक्तव्य राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेत. यावर आता राजक्रिया ( Dhananjay Munde statement on ncp cm ) प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on ncp cm ) यांनी लोकशाहीत सगळ्यांनाच बोलण्याचा अधिकार आहे, पण काहींना दिवसाही स्वप्न पडतात, असे म्हणत धनंजय मुंडे ( ncp cm ) यांना टोला हाणला.

Nana Patole on Dhananjay Munde
राष्ट्रवादी मुख्यमंत्री धनंजय मुंडे विधान

By

Published : Jun 4, 2022, 12:43 PM IST

नागपूर - आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ( Nana Patole on Dhananjay Munde ) असेल, असे वक्तव्य राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेत. यावर आता राजक्रिया ( Dhananjay Munde statement on ncp cm ) प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on ncp cm ) यांनी लोकशाहीत सगळ्यांनाच बोलण्याचा अधिकार आहे, पण काहींना दिवसाही स्वप्न पडतात, असे म्हणत धनंजय मुंडे ( ncp cm ) यांना टोला हाणला. यावर प्रतिक्रिया देणार नाही, असेही नाना पटोले म्हणालेत.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

हेही वाचा -World Bicycle Day : जागतिक सायकल दिनानिमित्त स्मार्ट सिटीतर्फे 'सायकल रॅली'; अनेकांनी घेतला सहभाग, पाहा व्हिडिओ

यावेळी बहुजन आघाडीचे हिंतेंद्र ठाकूर यांनी भाजपला पाठिंबा दिला यावर बोलताना पटोले म्हणाले की, बहुजन आघाडीसह सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्री आणि आमचे नेते बाळासाहेब थोरात चर्चा करत आहे. यातच हितेंद्र यांच्याशी चर्चा करून वेळेच्या आत त्यांचे मतपरिवर्तन करण्यात महाविकास आघाडीला यश येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

निवडणुका पुढे ढकलू शकतात -एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यास फेरबदल करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे म्हणत असतील तर कोरोनाचा अंदाज घेऊन निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो. कारण कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे, त्यामुळे गरजेनुसार निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकते, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

अध्यक्षांना निवडणुका होईपर्यंत कायम ठेवायचे का -राज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या ५१ जणांचा राजीनामा झाला. पण आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यामुळे या काळात नवीन अध्यक्ष नेमायचा का? की निवडणुकी पर्यंत त्यांना कायम ठेवावे? याबाबत हायकमांडशी चर्चा करणार, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

गांधी परिवाराला हात लावल्यास जेल भरो करू -केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, रुपयाच्या मुल्यात घसरण होत आहे, महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांचे अपयश झाकण्यासाठी गांधी परिवाराला टार्गेट केले जात असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला. देशातला काँग्रेस कार्यकर्ता समर्थ आहेत, गांधी परिवाराला हात लावला तर देशभरात जेलभरो करण्याचा इशाराही पटोले यांनी दिला.

विकासाची कामे बाजूला टाका पण जातीनिहाय जनगणना करा -ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या कामाला वेग आला, काँग्रेसकडून सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू आहे, विकासाची कामे बाजूला टाकली तरी चालेल, पण जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा -Mohan Bhagwat on Gyanvapi : राममंदिरा नंतर आता आम्हाला आंदोलन करायचे नाही - मोहन भागवत

ABOUT THE AUTHOR

...view details