महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूरकरांनो सावधान! तुमच्यावर पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची आहे नजर... - नागपूर वाहतूक पोलिसांची नवीन योजना

नागपूर शहराच्या लोकसंख्येबरोवर वाहनांची संख्याही 20 लाखाचा घरात जाऊन पोहचली आहे. पण कोरोनामुक्तीकडे जात असताना वाहतूक नियम तोडणाऱ्यांच्या संख्येतच वाढ झाली असून ही संख्या जवळपास 3 लाख 22 हजारापेक्षा अधिक आहे. तर 8 महिन्यात जवळपास 25 कोटींच्या घरात दंड ठोठावण्यात आला आहे.

Nagpurkars beware! The third eye of the police is on you ...
नागपूरकरांनो सावधान! तुमच्यावर पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची आहे नजर...

By

Published : Oct 9, 2021, 10:25 PM IST

नागपूर - उपराजधानीचे नागपूरात वाहतुक नियमाचे पालन करण्याकडे नागरिक सर्रास दुर्लक्ष करत आहेत. शहरात केवळ 8 महिन्यात जवळपास 25 कोटींच्या घरात दंड ठोठावण्यात आला आहे. आपल्याला कोणी पहिले नाही असा समज ठेवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी सावध व्हा, कारण पोलिसांचा तिसरा डोळा तुमच्यावर नजर ठेवून आहे. होय शहरात विविध भागात असलेले 3500 सिटीटीव्ही सोबतच वाहतूक पोलीस लक्ष तुमचावर आहे. एखाद्या वाहतूक पोलिसांना चकमा देऊन बहादूर बनण्यापेक्षा नियम पाळून समजदार नागपूरकर व्हा असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी केले आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने...

नागपूरकरांनो सावधान! तुमच्यावर पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची आहे नजर...

950 पेक्षा जास्त लोकांचे प्राण अपघातात गेले -

नागपूर शहराच्या लोकसंख्येबरोवर वाहनांची संख्याही 20 लाखाचा घरात जाऊन पोहचली आहे. यामध्ये कोरोनाच्या काळात कमी झालेले ट्राफिक नियमांचा भंग करणारे प्रादुर्भाव पुन्हा सक्रीय झाले आहे. पण कोरोनामुक्तीकडे जात असताना वाहतूक नियम तोडणाऱ्यांच्या संख्येतच वाढ झाली असून ही संख्या जवळपास 3 लाख 22 हजारापेक्षा अधिक आहे. यासोबतच नियम तोडून वाहन चालवणाऱ्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, शिवाय अपघातामुळे मृत्यूही होत आहेत. यामध्ये मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या कालखंडात नागपूर जिल्ह्यात जवळपास 2500पेक्षा जास्त अपघात झाले असून 950 पेक्षा जास्त लोकांचे प्राण अपघातात गेले आहे. हे आकडे जीवघेणी वाहनांची स्पर्धा पाहता बरेच बोलके आहेत. कारण या काळात कोरोनाशी लढा देत असताना काहीचे वेगवान वाहने हे त्यांच्या जीवाला तर काही वाहने दुसऱ्याचा जीव घेण्यास कारणीभूत ठरल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

अपघात होण्याची कारणे तरी किती क्षुल्लक...

अपघातांच्या कारणांमध्ये वेगाने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवणे हे प्रमुख कारण आहे. यात सिग्नल जम्प (तोडणे), विना हेलमेट प्रवास करणे, दारू पिऊन वाहन चालवणे. दुभाजक तोडून रस्ता ओलांडल्याने भरधाव वाहनांची धडक, राष्ट्रीय महामार्गावर विरुध्द दिशेने बराच लांबपर्यंत चालत गेल्याने अपघात होत असल्याचीही बाब अभ्यासात पुढे आली आहे.

वाहतूक अपघातात समोर आलेले वास्तव -

अपघातांचे जेव्हा निरीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय माहामार्गावर झालेल्या अपघातांची संख्या 66, तर राज्यमाहामार्गावर झालेले अपघात काही प्रमाणात कमी असून संख्या 15 आहे, पण सर्वाधिक अपघात शहराच्या आतील भागात किंवा रिंगरोडवर आणि जोडणारे रस्ते आहे. तसेच या त्या त्या वेळेत पहिले असता सायंकाळी 6 नंतर मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अपघात झाले आहे. मागील 8 महिन्यात 49 त्या वेळेत अपघाताची नोंद झाली आहे. रात्री 1 ते सकाळी 9 दरम्यान 34, सकाळी 9 ते दुपारी 12 वाजे 27, दुपारी 12 ते 3 पर्यंत 23 अपघातांची नोंद आहे. तसेच यात सर्वाधिक अपघात झाले आहे.

वाहतूक प्रशासन काय करत आहे?

अपघातात उपययोजना करताना म्हणजे ब्लॅक स्पॉट हे असून त्यांना कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राष्ट्रीय माहामार्ग आणि राज्य महामार्ग पोलीस यांच्याकडून केल्या जात आहेत. त्यामध्ये सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून रस्ते जनजागृती, रेडिओ काही रुग्णालय यांच्या माध्यमातून पथनाट्य सादरीकरण करतही पाऊले उचलण्यात आले आहे. सर्वेक्षण मधून ब्लॅक स्पॉट तसेच नागरिकांना नियमाचे पालन करण्यासाठी आवाहन केले जात आहे. यात जवळपास 7 लाख लोकांनी नियम तोडून नियमाचे उल्लंघन करण्याचे काम हे नक्कीच जीवावर बेतणारे आहे. तसेच अनेक युवक हेलमेट न घालता भरधाव वाहन चालवत असल्याने स्वतःसह पादचाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत.

नागपूरकरांनो सावधान होऊन वाहन चालवा -

शहरात लोकांना केवळ दंड करून चालणार नाही. यासाठी त्यांनी स्वयंफुर्तीने पुढे येण्याची गरज आहे. कारण नियम पाळले नाही, तर त्याचा फटका त्यांना बसू शकतो तो दंडाची स्वरूपात असेल तर त्याची भरपाई होऊ शकले. पण त्याची शिक्षा जर कोणाच्या जीव जाऊन मिळत असेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. कारण कोरोना सारख्या महामारीच्या संकटाला तोंड देऊन जीव वाचला आहे. पण वाहन चालताना केलेल्या चुकीला माफी नसणार आहे. यामुळे नागपूरकरांनी वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना केले आहे.

हेही वाचा -World Postal Day : इंटरनेटच्या काळातही नागरिकांचे टपाल सेवेला प्राधान; ईटीव्ही भारतचा विशेष संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details