नागपूर -जिल्हापरिषद अध्यक्ष,( Nagpur Zilla Parishad president ) उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व कायम ( Nagpur Zilla Parishad President, Vice President election dominated by Congress ) राहिले आहे. काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला सपशेल अपयश आले आहे. ध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मुक्ता कोकरडे यांना 39 मते मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी कुंदा राऊत यांना ३८ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेले काँग्रेसचे बंडोखोर नाना कंबाले यांना १८ तर उपाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिम कावरे यांना १९ मते मिळाली. एकवेळी भाजपने काँग्रेसच्या बंडखोरांना समर्थन देण्यासाठी आपले उमेदवार मागे घेतले होते.
भाजपचे ऑपरेशन लोटस फसले -गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला आहे. हिसंधी मानून विरोधी पक्ष भाजपने आपली व्युहरचना आखली होती. काँग्रेसपक्षाच्या नाराज गटाला ऐनवेळी समर्थन देऊन भाजपने निवडणूकीची चुरस वाढवली होती. मात्र निवडणूक रिंगणात तरबेज असणारे सुनील केदार यांना मात्र मात देता आली नाही.