नागपूर - रामजन्मभूमीचा वादाचा न्यायालयात निपटारा झाल्यानंतर आज भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिमाखदार सोहळा अयोध्येत पार पडला. त्या निमित्ताने आज नागपूर शहरात हिंदू संघटनांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विश्व हिंदू परिषद बजरंज दलाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. उत्तर नागपूरच्या जरीपटका भागातील इंदिरा गांधी वसाहतीत नागरिकांनी भर पावसात १ हजार १०० दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला.
अयोध्या भूमिपूजन सोहळा, विश्व हिंदू परिषद, बजरंज दलातर्फे नागपुरात दीपोत्सव - nagpur rss news
रामजन्मभूमी ऐतिहासिक सोहळ्यावेळी नागपुरात हिंदू संघटनांनी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले. विश्व हिंदू परिषद बजरंज दलाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. इंदिरा गांधी वसाहतीत नागरिकांनी भर पावसात १ हजार १०० दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला.
विश्व हिंदू परिषद बजरंज दलातर्फे नागपुरात दीपोत्सव
आज दिवसभरात भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदसह अनेक हिंदू संघटनांनी जल्लोष आणि आनंदोत्सवाचे आयोजन केले होते. तब्बल ७७ वेळा अयोध्येत राम मंदिरासाठी लढाई लढण्यात आली. आज त्या लढाईचा विजय दिवस साजरा होताना बघण्याचे भाग्य तरुण पिढीला मिळाल्याचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे राजकुमार शर्मा म्हणाले.