नागपूर -राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) विदर्भ दौऱ्यावर आहे. आज नागपुरात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (Nag Vidarbha Chamber of Commerce program) तर्फे संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांची उपस्थिती होती. यावेळी व्यापारी आणि उद्योजकांनी शरद पवार यांना त्यांना येत असलेल्या समस्या सांगितल्या. यावर शरद पवार यांनी व्यापारी आणि उद्योजकांच्या सर्व तक्रारी नोंद केल्या व लवकरच मुंबईमध्ये नागपूरच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा शब्द दिला.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित या संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (ncp leader Praful Patel) हे देखील सहभागी झाले होते. यावेळी व्यापारी आणि उद्योजकांनी शरद पवार यांच्या समोर त्यांना येत असलेल्या समस्यांचा पाढा वाचला. राज्य सरकारच्या अनेक धोरणांमुळे व्यापार करणे कठीन जात असल्याने एक तर व्यापार बंद करावा किव्हा शेजारच्या राज्यात स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय नसल्याचे गाऱ्हाणे व्यापाऱ्यांनी मांडले. यावर शरद पवार यांनी व्यापारी आणि उद्योजकांच्या सर्व तक्रारी नोंद केल्या व प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा शब्द दिला.
कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. कोकण दौरा आटोपल्यानंतर त्यांनी विदर्भावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. आजपासून शरद पवार यांच्या नागपूर आणि विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.