महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur Thermal Power Plant : नागपूर कोराडी औष्णिक वीज केंद्र राख तलावाचा बांध फुटला; नागपूरकरांवर जलसंकट, शेतीवरसुद्धा होणार परिणाम - लीना बुद्धे संचालिका सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

नागपूर शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर बांधलेला कोराडी औष्णिक वीज केंद्राचा ( Ash Dam of Koradi Thermal Power Station ) खसाळा येथील राखेचा बांध शनिवारी अचानक फुटला. त्यामुळे राखेच्या बांधातून लाखो लिटर राखमिश्रित पाणी परिसरात नाल्यावाटे नदीत जाऊन मिसळले आहे. खसाळासह शेजारचा मसाळा, खैरी, कवठा, उप्पलवाडी या गावापर्यंत राखमिश्रित पाणी पोहोचले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या राख तलावाचा बांध फुटल्याचे परिणाम म्हणून त्याचा त्रास नागपूरकरांना सोसावा ( Water crisis on the people of Nagpur ) लागणार आहे. याची भीती अगोदरच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या लीना बुद्धे यांनी दिली होती. ( Leena Budhe Director Center for Sustainable Development )

Ash lake burst water crisis
राखेचा तलाव फुटल्याने जलसंकट

By

Published : Jul 18, 2022, 1:19 PM IST

Updated : Jul 18, 2022, 1:26 PM IST

नागपूर : कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या राख तलावाचा बांध फुटल्याचे ( Ash Dam of Koradi Thermal Power Station ) परिणाम म्हणून त्याचा त्रास नागपूरकरांना सोसावा लागणार आहे. पाणीपुरवठा होणार नसल्याने पुढील काही दिवस भोगावे लागतील, अशी चिन्हे आहेत. तसेच, या राखेमुळे परिसरातील शेतजमिनीत तसेच जवळपासच्या नदीनाल्यांपर्यंत तलावातील राख पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त या वर्षीच नाही ( ake ash has reached the agricultural land ) , तर येणाऱ्या हंगामातील पीकही घेता येणार नाही, अशी भीती पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या लीना बुद्धे ( Leena Budhe Director Center for Sustainable Development )यांनी व्यक्त केली आहे.

नागपूर औष्णिक वीज केंद्र राखेचा बांध फुटला : नागपूर शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर बांधलेला कोराडी औष्णिक वीज केंद्राचा खसाळा येथील राखेचा बांध शनिवारी अचानक फुटला. त्यामुळे राखेच्या बांधातून लाखो लिटर राखमिश्रित पाणी परिसरात नाल्यावाटे नदीत जाऊन मिसळले. खसाळासह शेजारचा मसाळा, खैरी, कवठा, उप्पलवाडी या गावापर्यंत राखमिश्रित पाणी पोहोचले. आणि आता तीच राखमिश्रित पाणी शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. शिवाय शेतीवर अवलंबून असणारे मात्र अडचणीत सापडले आहे.

लीना बुद्धे, संचालिका, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

लीना बुद्धे यांनी पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्याची मागणी : नागपूर जिल्ह्यातील वीज प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आधीपासूनच अभ्यास करणाऱ्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संचालिका लीना बुद्धे यांनी राखेच्या तलावाचे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाहणी करून नियोजन करण्यासाठी आग्रह धरला होता. पण, महाजनकोच्या अधिकाऱ्यांना त्याकडे केलेले दुर्लक्ष आता शेतकऱ्यांना आणि लगतच्या गावकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. आता राखमिश्रित पाणी शेतापर्यंत पोहोचल्यामुळे जमिनीवर राखेचा थर साचला आहे. या राखेला काढण्याचा प्रयत्न केल्यास सुपीक मातीही निघेल आणि परिणामी पीक उत्पादनावर त्याचा परिणाम होईल. तसेच नदीमिश्रित पाण्याचा निचरा भूजल पातळीत पोहोचल्याने भूजलालाही प्रदूषित होण्याची भीती सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संचालिका लीना बुद्धे यांनी व्यक्त केली.

जलशुद्धीकरण केंद्राने बंद केला उठाव : या राखेचा बंधाऱ्यामुळे शहरावर पिण्याच्या पाण्याचे जलसंकट निर्माण झाले आहे. नागपूर शहरातील उत्तर आणि पूर्वी भागाला कन्हान नदीवर असलेल्या महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होतो. कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा राखेचा बांध फुटण्याच्या दोन-तीन दिवस आधीपासूनच कन्हान नदीच्या पाण्यात राखेचा तवंग तरंगत आहे. त्यामुळे नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीने दोन दिवसापूर्वीच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र पाण्याचा उठाव बंद केला होता. आता बांध फुटल्यामुळे पुन्हा कन्हान नदीमध्ये केमिकलयुक्त राख प्रवाहामध्ये आल्याने जलशुद्धीकरण केंद्र पुढेही आणखी काही दिवस बंद असणारा आहे.

दुर्लक्ष करणारे दोषींवर करवाईची गरज : खसाळाजवळ 341 हेक्टर क्षेत्रात 2015 मध्ये तब्बल 65 कोटी रुपये खर्चून कोराडी औष्णिक वीज केंद्रातील राखेसाठी विशेष बांध तयार करण्यात आला होता. मात्र, राखेच्या बांधाची पावसाळ्यापूर्वी अवलोकन करून नियोजन करणे अपेक्षित होते ते झाले नाही. यासोबतच महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करीत लोकांच्या आरोग्याशी खेळच केला आहे. काही एनजीओने गेले काही महिने सातत्याने हा बांध फुटू शकतो, अशी भीती व्यक्त करीत महानिर्मिती तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे. याचा तपास आता करण्याची गरज आहे.

हेही वाचा :Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान; महाराष्ट्रातून होणार भरघोस मतदान

Last Updated : Jul 18, 2022, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details