नागपूर -गणपती बाप्पाच्या आगमनापासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहचू लागला आहे. गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) आता कोणत्याही जाती-धर्मापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सर्वधर्मसमभावाचा उत्सव ( A festival of pantheism ) म्हणून साजरा होऊ लागला आहे. गणेशोत्सव म्हणजे जाती आणि धर्म व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन माणसांना माणसांशी जोडणारा दुवा ठरतो आहे. याचे अतिशय जिवंत उदाहरण राज्याची उपराजधानी नागपूर शहरात बघायला मिळते आहे. १८ वर्षीय सिझेन सोहेल खान ( Nagpur Suzanne Sohail Khan ) हा मुस्लिम समाजातील मुलगा गेल्या दहा वर्षांपासून त्याच्या निवासस्थानी बाप्पाला विराजमानकरून मनोभावे पूजा करतो आहे. सिझेनचे अम्मी आणि अब्बू देखील गणेशोत्सवाचे दहा दिवस विघ्नहर्ताच्या भक्तीरसात अखंड बुडालेले असतात. रोज सकाळ संध्याकाळची आरती केली जाते, एवढंचं नाही तर संपूर्ण कुटुंबाला गणेशाची आरती तोंडपाठ झाली आहे, खान कुटुंबाची इतकी भक्ती आणि श्रद्धा गणपती बाप्पावर आहे, की सर्वधर्म एक असल्याचा संदेश देणारा गणपती म्हणून परिसरातील नागरिक आवर्जून दर्शनासाठी येतात.
Ganesh Chaturthi 2022 : गणरायाची मनोभावे सेवा करणारे नागपुरातील खान कुटुंब! - Khan And Family Brings Ganpati Bappa Home
गणपती बाप्पाच्या आगमनापासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाचा ( Ganeshotsav 2022 ) उत्साह आता शिगेला पोहचू लागला आहे. या निमित्ताने विविध प्रकारे बाप्पाची भक्ती करणारे गणेशभक्त बघायला मिळत आहे. मात्र,या सर्वात लक्ष वेधले ते म्हणजे नागपुरच्या मुस्लिम समाजातील सिझेन सोहेल खान ( Nagpur Suzanne Sohail Khan) या तरुणाने त्याच्या निवासस्थानी गेल्या दहा वर्षांपासून गणपती प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते.
माझा बाप्पा सर्वधर्मसमभावाचा प्रतीक :आपला भारत देश विविध प्रकारची संस्कृती, सण उत्सव आणि परंपरेने नटलेला आहे. संपूर्ण जगात आपला देश एकमेव असेल ज्या ठिकाणी सर्व धर्माचे बांधव गुण्यागोविंदाने नांदात आहे. एवढंच नाही तर सर्व धर्मियांच्या सण उत्सवात सहभागी होतात. सिझेन खानने सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा देखील आपल्या जगावेगळ्या संस्कृतीचा भाग ठरली आहे. म्हणूनच सिझेनच्या मते त्याचा बाप्पा सर्वधर्मसमभावाचा प्रतीक आहे.
हेही वाचा:Ganeshotsav 2022 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथीयांच्या हस्ते आरती