नागपूर -आज महानगरपालिकेसह शहरातील १०६९ शाळा सुरू झाल्या ( Schools Reopen In Nagpur ) आहेत. पावणेदोन वर्षांनंतर शाळेत लहान विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाल्याने शिक्षकवृंद सुखावले आहेत. तर ऑनलाइन शिक्षण घेऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत येण्याची संधी लाभल्याने तेदेखील समाधानी झाले आहेत. शाळेचा पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी ( IAS Radhakrishnan B ) यांनी एकूण परिस्थितीचा आढाव घेतल्यानंतर पालिकेच्या हद्दीतील वर्ग पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते.
Schools Reopen In Nagpur : हुश्श.. शाळा झाल्या सुरु, बच्चे कंपनी खुश तर, पालकही 'टेन्शन फ्री' - Corona Outbreak Nagpur
तब्बल पावणे दोन वर्षानंतर नागपूर महानगरपालिकेच्या ( Nagpur Municipal Corporation ) हद्दीतील पहिली ते सातवीची शाळा ( First To Seven Standard ) सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ओमायक्रॉन व्हॅरिएंटचा धोका ( Omicron Variant Threat ) वाढला होता. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. काल नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी ( IAS Radhakrishnan B ) यांनी एकूण परिस्थितीचा आढाव घेतल्यानंतर पालिकेच्या हद्दीतील वर्ग पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले ( Schools Reopen In Nagpur ) आहेत.
पहिल्याच दिवशी प्रचंड उत्साह
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण 1069 शाळा आहेत त्यापैकी मनपाच्या 116 आणि खाजगी 1053 शाळांचा समावेश आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या 1069 प्राथमिक शाळांमध्ये एकूण दोन लाख 49 हजार 715 विद्यार्थी संख्या आहे तर मनपाच्या शाळेमध्ये नऊ हजार 319 तर अन्य शाळांमध्ये दोन लाख 40 हजार 396 इतकी विद्यार्थी संख्या आहे. आज शाळा सुरू होताच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असल्याचं चित्र बघायला मिळाले. पहिल्याच दिवशी मनपाच्या शाळांमध्ये 70 ते 80 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याने शिक्षकांचा उत्साह वाढला आहे.
फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
तब्बल पावणेदोन वर्षानंतर विद्यार्थी शाळेत येत असल्याने त्यांचा उत्साह वाढवा या उद्देशाने महानगरपालिकेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा
नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Outbreak Nagpur ) कमी झाला असला तरी, ओमायक्रॉनचा धोका कायम ( Omicron Variant Threat )असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही याबद्दल पालकांमध्ये चिंता आहे. पालिका आयुक्तांनी शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर, कोरोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्यानुसार शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क आहे की नाही? हे तपासले जात आहे. त्यानंतर थर्मल टेस्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो आहे.