नागपूर- व्यापारी ऋषी खोसला हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सदर परिसरातील ऋषी खोसला हत्याकांड प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपींना या आधीच अटक झाली होती. ऋषीच्या हत्येप्रकरणी याआधी पोलिसांनी युथ फोर्सचा संस्थापक मिक्की बक्षी याला अटक केली होती.
नागपूरच्या ऋषी खोसला हत्याकांडात आणखी चार आरोपींना अटक - nagpur police
ऋषी खोसला हत्या प्रकरण हाय-प्रोफाइल असल्याने या खुनाचा उलगडा तत्काळ करण्याचा पोलिसांवर दबाव होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
![नागपूरच्या ऋषी खोसला हत्याकांडात आणखी चार आरोपींना अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4243975-277-4243975-1566794578655.jpg)
याप्रकरणी आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 22 ऑगस्टला रात्री व्यावसायिक ऋषी खोसला यांची हत्या झाली होती. आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे.
ऋषी खोसला हत्या प्रकरण हाय-प्रोफाईल असल्याने या खुनाचा उलगडा तत्काळ करण्याचा पोलिसांवर दबाव होता. पोलिसांनी सर्व क्षमतेनिशी या प्रकरणाचा तपास करुन अवघ्या ४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. मिक्की आणि ऋषी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर होते. त्याचे रूपांतर हे ऋषीच्या हत्येत झाल्याचे बोलले जात आहे.