महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दोन्ही अर्थसंकल्पातून पेट्रोल करात कपात न झाल्याने जनतेची निराशाच - नागपूर पेट्रोल-डिझेल दरवाढ न्यूज

आजच्या घडीला शहर विस्तारले आहे. त्यातही ग्रामीण भाग शहराशी जोडला असल्याने वाहनांची संख्या चांगलीच वाढली आहे. यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वाहनाशिवाय पर्याय नाही. यात घराबाहेर पडून काम करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन खर्चात झालेली वाढ महिन्याचे बजेट बिघडले आहे. तरीही विरोध करायला कोणीही तयार नसल्याने आहे त्या किमतीत पेट्रोल घेऊन वाहन चालवण्याची लोकांची मानसिकता झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

Nagpur Petrol Rate Public Reaction News
पेट्रोल करात कपात न झाल्याने जनतेची निराशा

By

Published : Mar 10, 2021, 5:53 PM IST

नागपूर - सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सामान्य लोक हैराण झाले आहे. रोज वाढत्या पेट्रोल दराने खिशाला चाप बसत आहे. केंद्राच्या बजेटकडून आशा असताना निराशा झाली. तेच राज्यसरकार तरी अर्थसंकल्पात विचार करेल, अशी आशा असताना त्यात निराशा झाल्याचे सांगितले जात आहे. पण सामान्य नागरिकांना काय वाटतेय, हे ईटीव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही अर्थसंकल्पातून पेट्रोल करात कपात न झाल्याने जनतेची निराशाच
क्रूड ऑइलचे दर वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सरकारकडून लागू केले जाणारे कर कमी करावेत, अशी मागणी होत होती. केंद्राच्या बजेटमध्ये पेट्रोल डिझेलवर लागणारे कर कमी होणार अशी चर्चा होती. पण तसे काहीही झाले नाही. यात राज्यसरकार केंद्राने पेट्रोलवरचे लागणारे कर कमी करावे, अशी आशा होती. पण राज्यसरकारच्या अर्थसंकल्पात घोर निराशा झाली. आजच्या घडीला शहर विस्तारले आहे. त्यातही ग्रामीण भाग शहराशी जोडला असल्याने वाहनांची संख्या चांगलीच वाढली आहे. यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वाहनाशिवाय पर्याय नाही. यात घराबाहेर पडून काम करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन खर्चात झालेली वाढ महिन्याचे बजेट बिघडले आहे.10 ते 12 हजार कमावणाऱ्याच्या अडचणीत वाढ

दैनंदिन कामासाठी बाहेर पडावे लागतेच. कामाचा शोधात फिरताना रोजच्या खर्चात वाढ झाली आहे. महागाई वाढत असताना तेवढ्याच पगारात काम करायचे, कसे असा प्रश्न समोर येत आहे. 10 ते 12 हजारांत काम करताना घर कसे चालवावे, असा प्रश्न पडल्याचा कारण खर्च वाढला आहे.

लोकांची मानसिकता झाली आहे

जरी आज पेट्रोल 98 रुपये लिटर असले तरी लोकांची पेट्रोल 100 रुपये लिटर विकत घेण्याची मानसिकता झाली आहे. कारण विरोध करायला कोणीही तयार नाही. विरोध करणारे आता सत्तेत आहे. यामुळे नागरिकांनी पेट्रोल मिळेल त्या किमतीत विकत आणि वाहन चालवायचे अशी मानसिकता करून घेतली असल्याचे मत ईश्वर माथने यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details