नागपूर -येथील (आरएसएस) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणारा दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा रईस अहमद असादउल्ला शेख याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस अहमद असादउल्ला शेखचा ताबा प्रोडक्शन वॉरंट वर घेण्यात आला आहे.
डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणारा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात - Nagpur Police taken custody of terrorist Raees Ahmed Asadullah Sheikh
डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणारा दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा रईस अहमद असादउल्ला शेख याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस अहमद असादउल्ला शेखचा ताबा प्रोडक्शन वॉरंट वर घेण्यात आला आहे.
कधी केली रेकी - रईस अहमद असादउल्ला शेखने गेल्यावर्षी जुलै महिन्यात नागपुरात येऊन डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच नागपुरातील इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती होती. त्यानंतर रईस अहमदला जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत रईसने पाकिस्तानमधील जैशच्या हँडलरच्या आदेशावरून नागपुरात रेकी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर नागपूर पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही काश्मीरमध्ये जाऊन त्याची चौकशी केली होती.
तपासात धक्कादायक खुलासे होणार - आता पुढील तपासासाठी एटीएसच्या नागपूर युनिटने रईसचा ताबा घेतला आहे. नागपुरात तो कोणाच्या सांगण्यावरून आला होता आणि त्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीची कुठून आणि कशी रेकी केली. तसेच कोण कोणती माहिती त्यांनी पाकिस्तान मधील आपल्या हँडलर पुरवली याचा तपास सुरू केला आहे.