नागपूर - वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ तयार करणे आणि ते व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Video Nagpur ) करण्याची क्रेज संपूर्ण देशात आली आहे. मात्र उपराजधानी नागपुरातील तरुणांना काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न अंगाशी आला आहे. धावत्या कारवर बसून व्हिडीओ ( stunting on a speeding car ) तयार करणाऱ्या सात तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली ( Nagpur Police take action against youths ) आहे. या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात सर्वांना ताब्यात घेतले होते, पोलिसांनी या तरुणांना समज देऊन सोडले असले तरी त्यांच्या कार जप्त केल्या आहेत.
'आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस यंत्रणा सक्षम' - कारवर बसून स्टंट करण्याचा व्हिडिओ हा एक एप्रिल रोजीच्या रात्रीचा असल्याचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. रात्रीच्या अंधारात पोलिसांची नजर चुकवून अश्या प्रकारे काही तरुण स्टंटबाजी करत असतात, त्यांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.