नागपूरनागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुख्याध्यापकाचे अपहरण त्यांच्याच एका मैत्रिणीने girlfriend kidnapped the principal for ransom केले. काही सहकाऱ्यांच्या मदतीने खंडणीसाठी अपहरण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत सूचना मिळताचं पोलिसांनी वायुवेगाने तपासाची सूत्र हलवली. त्यामुळे काही तासातचं अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाची सुखरूप सुटका Nagpur police rescued झाली. कथित मैत्रिणीसह तिचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत.Nagpur crime news today
३० लाख रुपयांची खंडणी मागणीkidnapping for ransomया प्रकरणातील फिर्यादी प्रदीप मोतीरामानी हे महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवार संध्याकाळी ते काही कामानिमित्ताने घराबाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेचं नाही. शुक्रवारी रात्री जेव्हा त्यांच्या मुलीने वडिलांच्या फोनवर संपर्क साधला, तेव्हा अपहरणकर्त्यानी प्रदीप यांच्या सुटकेसाठी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर मोतीरामानी कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच रात्रीपासून पोलीस पथक प्रदीप यांचे शोध घेत होते. मात्र, काल संध्याकाळी ते सुखरूप घरी परतले आहेत.