महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दोन दिवसांत दोन सेक्स रॅकेटवर पोलिसांच्या धाडी; दोन अल्पवयीन तरुणींची सुटका - सेक्स रॅकेट सागर काजनीकर अटक

नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दोन दिवसांत दोन कुंटनखान्यावर धाडी टाकून दोन अल्पवयीन तरुणींसह दोन आरोपींना अटक केली आहे.

Sagar Kajnikar arrest sex racket case
सेक्स रॅकेट पोलीस कारवाई नागपूर

By

Published : Aug 24, 2021, 10:22 PM IST

नागपूर -नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दोन दिवसांत दोन कुंटनखान्यावर धाडी टाकून दोन अल्पवयीन तरुणींसह दोन आरोपींना अटक केली आहे.

माहिती देताना महिला पोलीस अधिकारी

हेही वाचा -नागपूर : नारायण राणे विरोधात युवा सेनेचे कोंबड्यांसह आंदोलन

पहिली कारवाई -

सागर काजनीकर (वय २२) आणि त्याची मैत्रीण नीतू यांनी चार महिन्यांपासून मेडिकल चौकातील उंटखान परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये हायप्रोफाईल सलून सुरू केले होते. मात्र त्या सलूनच्या आड सागर आणि त्याची मैत्रीण नीतू देहव्यावसाय चालवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर एक पंटर पाठवून माहितीची सत्यता तपासण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच छापा टाकून सागर काजनीकर याला अटक केली, मात्र त्याची मैत्रीण नीतू पळून जण्यात यशस्वी झाली. पोलिसांनी या कुंटणखान्यातून एका १६ वर्षीय तरुणीसह दोघींची सुटका केली आहे. सागर आणि नीतू विरोधात इमामवाडा पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई -

दुसरी कारवाई ही सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद नगर येथे झाली. रोशनी हरीश हटवार नामक एका महिलेने घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी कुंटनखाना सुरू केल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजल्यानंतर पोलिसांनी त्या घरावर निगराणी ठेवायला सुरुवात केली होती. माहितीची सत्यता पटल्यानंतर पोलिसांनी लागलीच त्या घरी धाड टाकून एका अल्पवयीन तरुणीची सुटका केली आहे, तर आरोपी मोहम्मद रिझवानला अटक केली आहे.

हेही वाचा -नागपुरात केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात तक्रार; राणे महाराष्ट्राच्या राजकारणातील ग्रहण - न्हेरे

ABOUT THE AUTHOR

...view details