नागपूर -गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींचे घर सोडून ( Minor Girl Missing Cases Increased ) जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यासह इतरही कारणांनी मुलांसह वयस्क लोकांचेही घर सोडण्याचे प्रमाण वाढले. पण, नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Police Commissioner Amitesh Kumar ) यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या विशेष पथकाच्या कामगिरीने राजधानी मुंबईला मागे पाडत उपराजधानीत चांगली कामगिरी केली आहे. नागपूर पोलिसांनी दाखल प्रकरणात 84 टक्के लोकांना शोधून काढले ( Nagpur Police Found 84 Percent Missing Cases ) आहे.
मानसिक छळ यासह घरगुती वाद यासह अनेक घटना पहाता मागील सहा वर्षात म्हणजेच 2016 ते 2021 मध्ये सुमारे 2800 मुला-मुलींनी घर सोडले आहे. यातच मागील तीन वर्षाच्या कालावधीत 948 मुलींनी घर सोडले आहे. यात अनेक मुला-मुलींना फूस लावण्याचे प्रकार घडत असून, तीन वर्षांच्या कालावधीत 207 मुलेही बेपत्ता झाली. यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मानवी तस्करी प्रतिबंधक पथक स्थापन केले. यासाठी एक महिला पोलीस निरीक्षक म्हणून मंदा मनगटे आणि एपीआय रेखा संकपाळ यांच्यावर पथकाची जबाबदारी दिली. त्यांनीही ती जबाबदारी खुबीने पेलली आहे.
शोधकार्यात मुंबई-पुण्याला टाकले मागे - या पथकानेही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष प्रयत्नातून शोधमोहीम सुरू केली. यात कुठल्याही परिस्थितीत घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू केलेत. याच कामात मोठे यशही पोलीस विभागाच्या या पथकाच्या हाती लागले. त्यामुळे 84 टक्के लोकांना शोधून काढले. हेच प्रमाण पुणे जिल्ह्यात 81 टक्के तर यात मुंबई मागे पडली असून, 72 टक्के हरवलेल्या तक्रारी सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. पूर्वी हेच काम स्थानिक पोलीस स्टेशनच्या पातळीवर होत असत. पण, याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. क्राईम ब्रांचच्या मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने यात 2019 मध्ये 381 मुली बेपत्ता झाल्यानंतर 371 जणांना शोधून काढलेत. 2020 मध्ये 251 पैकी 241 मुलींना शोधून काढलेत. 2021 मध्ये 316 पैकी 231 जणींना शोधून काढले होते. 2021 मध्ये 3 हजार 755 बेपत्ता महिला-पुरुष आणि अल्पवयीन मुला-मुलींपैकी 3 हजार 363 व्यक्तींना शोध घेण्यात यश मिळाले. हेच प्रमाण ८४ टक्के आहे.