नागपूर- उपराजधानीत खुनाच्या घटना सातत्याने घडत आहे. शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत एका पुतण्याने स्वतःच्याच काकाचा खून केला आहे. कौटुंबिक वादातून खुनाची घटना घडली आहे. अशोक मेश्राम (४०) असे मृत काकाचे नाव आहे. तर सारंग मेश्राम असे खून करणाऱ्या पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीसह त्याच्या वडिलांनादेखील ताब्यात घेतले आहे.
पूर्ववैमनस्यातून पुतण्याकडून काकांचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात - नागपूर गुन्हे वृत्त
रात्री घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर आरोपी सारंग याने लाकडी दांड्याने झोपलेल्या काकांच्या डोक्यात वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत पंचशील कॉलोनीमध्ये मेश्राम कुटुंबीय राहतात. रात्री कौटुंबिक कारणावरून काका पुतण्यामध्ये वादा झाला. त्यावेळी या घटनेचे रुपांतर खुनाच्या घटनेत होईल असे कुणालाही वाटले नाही. काका आणि पुतण्या एकमेकांचे शेजारी आहेत. अशोक मेश्रेमा हे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी निर्माण कार्य सुरू आहे. रात्री घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर आरोपी सारंग याने लाकडी दांड्याने झोपलेल्या काकांच्या डोक्यात वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेहावर चादर पांघरली. त्यामुळे ते झोपलेले आहेत, असाच सगळ्यांना भास झाला. आज सकाळी ११ च्या सुमारास निर्माण स्थळी कामगार आल्यानंतरदेखील काका झोपून राहिल्याचे त्यांना जाणवले. कुणीही त्यांना उठविण्यचा प्रयत्न केला नाही. मात्र, बराच वेळा पासून त्यांची हालचाल होत नसल्याने त्यापैकी एकाने त्यांची चादर काढून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेची माहिती समजताच पाचपावली पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे.