महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बँकेत भरायचे साडे तेरा लाख नोकरानेच लुटले,सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग - cheating 13 lackh rupees

विश्वासू नोकराने १३ लाख ५० हजार रुपयाची रक्कम बँकेत न भरता लुटण्याचा कट रचला. आपल्या मित्रांच्या मदतीने तो स्वतःच जखमी झाला आणि पैसे लुटल्याचा बहाणा केला. पोलिंसांनी त्याचे बिंग फोडत मुस्क्या आवळल्या आहेत. नागपूरात ही घटना घडलीय.

साडे तेरा लाख नौकरानेच लुटले

By

Published : Jun 25, 2019, 6:20 PM IST


नागपूर - नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मस्कासाथ परिसरात एका व्यक्तिवर हल्ला करून साडे तेरा लाख लुटल्याची तक्रार तहसील पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर अतिशय धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणातील जखमीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अजय चांदवाणीसह त्याच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बँकेत भरायचे साडे तेरा लाख नौकरानेच लुटले

या घटनेची माहिती या प्रमाणे आहे की, मस्कासाथ परिसरात न्यू समाधान ट्रेडस नावाचे दुकान आहे. दुकानात काम करणारा अजय चांदवाणी नावाच्या नोकारावर दुकान मालकाचा मोठा विश्वास होता. बँकेचे सर्व व्यवहार नोकारच्या भरवशावर केले जायचे. सोमवारी दुकान मालकाने रोजच्या व्यवहारातील साडे तेरा लाख रुपये बँकेत जमा करण्याची जबाबदारी नोकर अजय कडे दिली होती. इतकी मोठी रक्कम बघून मालकाचा विश्वासू असलेल्या आजच्या मनात ते पैसे गहाळ करण्याची इच्छा जागृत झाली. त्याने या कामात त्याच्या दोन मित्रांनादेखील सहभागी करून घेतले होते. तिघांनी एका योजने अंतर्गत एका ठिकाणी भेटायचे ठरवले, तिघांची भेट होताच दुकानातील नोकर असलेल्या अजयने ते साडे तेरा लाख रुपये त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर स्वतःला जखमी करवून घेतले.

घटनाक्रम खरा वाटावा म्हणून दुकानाचा नोकर अजय चांदवाणी हा स्वतःहून रुग्णालयात भरती सुद्धा झाला. या सर्व प्रकरणानंतर दुकानाचे मालक यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले. पोलिसांनी सर्वात आधी cctv फुटेज तापसले असता जखमी नोकर हा त्याच्या दोन मित्रांसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात बातचीत करताना दिसून आले, पोलिसांनी जखमी नोकरला रूग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून साडेतेरा लाख रुपये जप्त केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details