नागपूर -कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या करून, आरोपीने स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी नागपूरमध्ये घडली होती. या प्रकरणात आज अतिशय धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपी आलोक माटूरकर याने सर्वात आधी त्याच्या मेव्हणीची हत्या केली. मात्र हत्या करण्यापूर्वी आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिने यादरम्यान सुरू केलेल्या मोबाईलच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये संपूर्ण घटनाक्रम रेकॉड झाला आहे. ही ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागली आहे.
कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या करून, आरोपीने स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी नागपूरमध्ये घडली होती. आलोक माटूरकर असं या आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र आलोकने हे टोकाचे पाऊल का उचलले? त्याने आपल्याच घरातील पाच जणांची हत्या का केली? या घटनेमागील नेमकं कारण काय याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी हा गेल्या महिन्यापासून मेव्हणीसह कुटुंबाला संपवण्याचा कट रचत होता, अशी माहिती समोर आली आहे.
'असा' आहे घटनाक्रम
आरोपी आलोक हा सर्वात आधी त्याच्या मेव्हणीच्या घरी गेला. घरी मेव्हणी एकटीच होती. तिची आई म्हणजेच आरोपीची सासू त्याच्या घरी आली होती. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपी आलोकने घरात प्रवेश केला. त्याच्याकडे असलेला चाकू पाहून तिला संशय आल्याने तिने मोबाईचे व्हॉइस रेकॉर्डर अप्लिकेशन सुरू केले होते. आरोपीने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेल्या वादात आरोपीने चाकूने गळा चिरून तिची हत्या केली. दरम्यान याचवेळी आरोपीची सासू देखील घरी परतली, जावाई घरी आल्याचे बघून तिच्या सासूला संताप अनावर झाला. मात्र काही कळण्यापूर्वीच आरोपीने सासूची देखील हत्या केली. या सर्व घटनाक्रमाची व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागली असून, यावरून सर्व घटनाक्रम स्पष्ट होत असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.