महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर महापालिकेची चायनीज मांजा विकणाऱ्यांविरुद्ध मोहीम

मकर संक्रांत निमित्ताने सुमारे महिनाभरापूर्वीच पतंग आणि मांजा विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. यामध्ये घातक आणि जीवघेणा समजला जाणाऱ्या चायनीज मांज्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने अशा दुकानांवर कारवाई सुरू झालेली आहे.

manja
manja

By

Published : Dec 30, 2020, 5:34 PM IST

Updated : Dec 30, 2020, 5:46 PM IST

नागपूर - नाशिक येथे चायनीज मांज्यामुळे एका विवाहित महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आणि पोलीस विभागाने चायनीज मांज्याच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. मकर संक्रांत निमित्ताने सुमारे महिनाभरापूर्वीच पतंग आणि मांजा विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. यामध्ये घातक आणि जीवघेणा समजला जाणाऱ्या चायनीज मांज्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने अशा दुकानांवर कारवाई सुरू झालेली आहे.

शोधमोहीम

पाचपावली पोलिसांना सूचना मिळाली होती, की बांगलादेश परिसरातील अनेक दुकानांमध्ये नायलॉन आणि चायनीज मांज्याची विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवली असताना काही दुकानांमध्ये मांजा आढळून आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मांजा आणि पतंग जप्त केल्या आहेत.

मनपाकडूनही कारवाई सुरू

संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. चार झोनमध्ये केलेल्या नऊ कारवाईच्या माध्यमातून सुमारे नऊ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नऊ हजारांचा दंड वसूल

प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तानच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. धंतोली झोनअंतर्गत एक, गांधीबाग झोनअंतर्गत सहा, सतरंजीपुरा झोनअंतर्गत एक आणि आशीनगर झोनअंतर्गत एक कारवाई करण्यात आल्या. या माध्यमातून नऊ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.१६४ नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली.

Last Updated : Dec 30, 2020, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details