नागपूर - महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा पहिलाच जनता दरबार बुधवारी भरला होता. यावेळी नागरिकांनी आपल्या अनेक समस्या घेऊन कार्यालयात गर्दी केली होती.
नागपुरात तुकाराम मुंढेंच्या पाहिल्याच जनता दरबाराला नागरिकांची गर्दी... हेही वाचा... भारत बंद : राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण
आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा नागपूर महानगरपालिकेचा आज दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी दिवसभर त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. दिवसभरात बैठका आणि विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सायंकाळी जनता दरबार घेतला.
हेही वाचा... थेट सरपंच निवड रद्द; आता सदस्यच निवडणार सरपंच
सायंकाळी 4 ते 5 या कालावधीत त्यांनी घेतलेल्या जनता दरबारात अनेक लोकांनी आपले प्रश्न आणि समस्या मांडल्या. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यामुळे जनता दरबारात समस्यां सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.