राष्ट्रहिताच्या काम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो हे दुर्दैवी - हेमंत गडकरी - नागपूर मनसे नेते हेमंत गडकरी बातमी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर या सरकारने गुन्हा दाखल करून मोठी चूक केली आहे. ज्या पद्धतीने जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे. त्यात जनतेनेलाही सरकारच्या निर्णयाचा संताप आला असेल. जनता सुद्धा वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करेल. आमचे सगळे कार्यक्रम परवानगी घेऊन पोलिसांना माहिती देऊन करतो. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही काम करत आहे, असेही राज ठाकरे यांचे अंतिम आदेश असेल ते आम्हाला मान्य आहे.
राष्ट्रहिताच्या काम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो हे दुर्दैवी - हेमंत गडकरी
नागपूर -राष्ट्रहिताचे काम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, आमच्या पक्षातील पदाधिकारी याना नोटीस बजावल्या जात आहे. मात्र, दुसरीकडे अनधिकृत लावलेले भोंगे उतरवले जात नाही. पण सुडबुद्धीने कारवाई होत आहे. जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता जळफळाट झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारनेही कारवाई केल्याची टीकाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली आहे.
Last Updated : May 3, 2022, 10:41 PM IST