महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'जनता कर्फ्यू' नाही...पण दोन दिवस स्वयंस्फूर्तीने घरातच राहा, नागपूर महापौरांचे आवाहन - corona in nagpur

नागपूर महानगरपालिकेद्वारे 'जनता कर्फ्यू' संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतिही भीती न बाळगता बाजारांमध्ये गर्दी करू नये. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी या शनिवारी आणि रविवारी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे .

janata curfew in nagpur
'जनता कर्फ्यू' नाही...पण दोन दिवस स्वयंस्फूर्तीने घरातच राहा, महापौरांचे आवाहन

By

Published : Sep 5, 2020, 9:02 AM IST

नागपूर - शनिवार आणि रविवार(6सप्टेंबर) दोन दिवस नागपूर शहरात 'जनता कर्फ्यू' लागू करण्याची मागणी जनप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. सोशल मीडियावरही 'जनता कर्फ्यू' लागू होत असल्याचे संदेश व्हायरल होत आहेत. मात्र, नागपूर महानगरपालिकेद्वारे 'जनता कर्फ्यू' संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतिही भीती न बाळगता बाजारांमध्ये गर्दी करू नये. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी या शनिवारी आणि रविवारी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे .

'जनता कर्फ्यू' नाही...पण दोन दिवस स्वयंस्फूर्तीने घरातच राहा, महापौरांचे आवाहन

सुरुवातीलाच 'आयसीएमआर' आणि इतर सरकारी एजन्सींनी सप्टेंबर महिन्यात कोविडचा धोका वाढण्याचा इशारा दिला होता. मनपातर्फे चाचणी केंद्रही वाढवण्यात आले आहेत. दररोज शहरातील सुमारे 6 ते 8 हजार नागरिकांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसात सुमारे सात 6800 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोविडचा वाढता धोका लक्षात घेता जनप्रतिनिधींद्वारे 'जनता कर्फ्यू'ची मागणी करण्यात आली होती.

'जनता कर्फ्यू'च्या भीतीने लोक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. हे धोकादायक आहे. आज आपली प्रत्येकाची सुरक्षा आपल्या स्वतःच्याच हातात आहे. त्यामुळे प्रत्येकाने शहराप्रती आणि विशेषतः आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वयंस्फूर्तीने व स्वयंशिस्तीने शनिवार आणि रविवार हे दोन दिवस घरातच राहावे. मनपातर्फे कुणावरही दंडात्मक कारवाईची वेळ येऊ नये, सर्वांनी काटेकोरपणे दिशानिर्देशांचे पालन करावे. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्व कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नियमांचे पालन करून घरीच राहण्याचा संकल्प करूया, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details