नागपूर - कोरोनाच्या संकटात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये स्वयंसेवी संस्थेने आपापल्यापरीने उत्तम सेवाकार्य केलेले आहे. स्थलांतरीत मजूर, बेघरांना अन्न पुरविणे असो की श्रमिकांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक सहकार्य. या साऱ्यातच शहरातील स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले. या संकटाच्या काळात पुढेही स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. यासंदर्भात शहरात काय करायला हवे आणि पुढे काय करायला हवे, यासंबंधी महापौर संदीप जोशी यांनी स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधला आहे. आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी मागितल्या आहेत
कोविडच्या अनुषंगाने महापौरांनी मागितल्या स्वयंसेवी संस्थांकडून सूचना
महापौर संदीप जोशी यांच्या आवाहनावरून सुमारे ८४ संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभागी होउन आपल्या सूचना मांडल्या. परिसरात गर्दी होउ नये यासाठी संस्थांच्या प्रतिनिधींना ठराविक वेळ देउन त्याच वेळेत संवाद साधण्यात आला.
महापौर संदीप जोशी यांच्या आवाहनावरून सुमारे ८४ संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभागी होउन आपल्या सूचना मांडल्या. परिसरात गर्दी होउ नये यासाठी संस्थांच्या प्रतिनिधींना ठराविक वेळ देउन त्याच वेळेत संवाद साधण्यात आला.
यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, की आज शहरात ४हजार ५०० च्या जवळपास कोविडची रुग्ण संख्या झालेली आहे. दररोज नवनवीन भागातील रुग्ण निघत असल्याने शहरात प्रतिबंधित क्षेत्रही वाढत आहेत. शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर आता घरीच उपचार केले जाणार आहेत. या संपूर्ण बाबींमध्ये मनपाला वैद्यकीय आणि इतर बाबतीत अनेक अडचणी येणार आहेत. यावर काय उपाययोजना करता येउ शकतात व स्वयंसेवी संस्था काय भूमिका बजावू शकतील, यासंबंधी संस्थांनी आपली भूमिका आणि सूचना मांडण्याचे आवाहनही महापौरांनी यावेळी केले. सोबतच पुढील काळात मनपाच्या प्रशासकीय कार्यात आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली.