नागपूर -नागपूरसह विदर्भाची १४१ वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरासंपन्न असलेला बडग्या-मारबत उत्सवाला सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाची झळ सहन करावी लागली आहे. एरवी लाखोंच्या उपस्थितीत निघणारी मारबत मिरवणूक कोरोना प्रतिबंधामुळे रद्द करण्यात आली. मात्र काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि पोलिसांच्या बंदोबस्तात पिवळ्या मारबतीचे विसर्जन करण्यात आले.
8 दिवस घेतात दर्शन
जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत आणि काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. तऱ्हाने तेली समाजाच्या १३७ वर्षे जुन्या पिवळी मारबत उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर इतर सर्व समाजाकडून काळी मारबतची स्थापना केली जाते. सुमारे आठ दिवस भाविक दोन्ही मारबतचे दर्शन घेतात. यंदा कोरोनामुळे प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली. पण पिवळ्या आणि काळ्या मारबतीला श्रद्धेचे स्थान असल्याने दोन्ही मारबतींची निर्मिती करून स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पोळ्याच्या पाडव्याला काळ्या आणि पिवळ्या मारबतीची भव्य मिरवणूक काढली जाते. एका चौकात दोन्ही मारबतींचे मिलन झाल्यानंतर दोन्ही मारबती आपल्या-आपल्या मार्गाने निघून जातात. त्यानंतर परंपरेनुसार पिवळ्या मारबतींचे नाईक तलाव परिसरात दहन करण्यात आले.