नवी दिल्ली - मराठमोळी नागपूरची मुलगी आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोडने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ( India Open badminton tournament ) ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालला पराभूत करत ( Malvika Bansod beats Saina Nehwal ) इतिहास रचला आहे. नवी दिल्लीतील के.डी जाधव इनडोअर हॉलमध्ये सायना नेहवालला पराभूत करत मालविकाने स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. मालविकाने सायनाला २१-७ आणि २१-९ अशा दोन सेटमध्ये पराभूत केल्याने नागपुरातील क्रीडा प्रेमींनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
ती नेहमी माझी आदर्श आहे - मालविका
सायनाविरुद्ध झालेला सामना हा खूप चांगला होता. यावेळी मी त्यांना पहिल्यांदा भेटली आहे. ती नेहमी माझी आदर्श आहे. हा विजय मला पुढील सामना विजयी होण्यासाठी आत्मविश्वास देईल असे मालविका हिने सांगितले आहे.
पीव्ही सिंधू क्वॉर्टर फाइनलमध्ये -