नागपूर -नागपूर-लखनऊ या इंडिगो विमानात काही तांत्रिक बिघाड ( Nagpur Lucknow Indigo flight malfunction ) झाल्यामुळे त्यांचे नागपूर विमानतळावर इमर्जेन्सी लँडिंग करण्यात आली ( Indigo flight Emergency landing at Nagpur Airport ) आहे. विमानात जळण्याचा वास येत होता, त्यामुळे पायलटने समयसूचकता राखत विमान आपत्कालीन परिस्थितीत नागपूर विमानतळावर उतरवावे लागले आहे. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
इंडिगो फ्लाईटचे इमर्जेन्सी लँडिंग - नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावर इंडिगो फ्लाईटचे इमर्जेन्सी लँडिंगची घटना पुढे आली आहे. नागपूरवरून लखनऊला जाणारे विमान 6E-7074 ने उड्डाण भरल्यानंतर विमानातून धूर येत येऊ लागला. जळल्याचा वास येत असल्याने वैमानिकाने ट्रॅफिक कंट्रोलला इमर्जेन्सी लँडिंगची परवानगी मागितली. त्यावेळी विमानात 49 प्रवाशी होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ATS ने विमानतळावर लँडिंगची परवानगी देण्यात आली. लँडिंग नंतर विमानाची तपासणी केली असता कुठलही तांत्रिक बिघाड नसल्याचे समोर आले. विमानतळ प्रशासनाने दुसऱ्या विमानाने प्रवाशांना पाठविले होते.