महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागरी सुविधा मिळवण्यासाठी महापालिकेने तयार केले 'नागपूर लाईव्ह सिटी अॅप' - nagpur live city app

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ‘नागपूर लाईव्ह सिटी’ हे अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून कोणतिही तक्रार घरबसल्या दाखल करता येणार आहे.

tukaram munde
tukaram munde

By

Published : Apr 9, 2020, 10:17 AM IST

नागपूर - नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी सुविधांमधील समस्या आणि तक्रारींसाठी आता पालिकेच्या कोणत्याही कार्यालयात चकरा मारण्याची गरज पडणार नाही. कारण आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ‘नागपूर लाईव्ह सिटी’ हे अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून कोणतिही तक्रार घरबसल्या दाखल करता येणार आहे.

तुकाराम मुंढे- आयुक्त नागपूर महानगरपालिका

या अॅपमुळे नागरिकांना भेडसावणा-या पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, शाळा आणि शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर, जन्म मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान अशा विविध तक्रारी मनपाच्या माध्यमातून सोडवून घेता येतील. अॅप वापरण्यास सोपे असून नागरिकांच्या अनुकुलतेनुसार तयार करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. एवढंच नाही तर नागरिकांना आपल्या तक्रारीची सद्यस्थिती ‘सिटीजन डॅशबोर्ड’वर प्रत्यक्ष पाहता देणार आहे.

अॅपमुळे होणारे फायदे-

अॅपमुळे नागरिक आणि अधिकाऱयांच्या कामामध्ये पारदर्शकता येईल. तक्रारीसंदर्भात करण्यात येणारी कार्यवाही आणि विहीत वेळेत तक्रार सोडविण्याबाबत प्रत्येक अधिका-याची जबाबदारी निश्चीत होईल. विहीत वेळेत कार्यवाही न झाल्यास संबंधित तक्रार वरिष्ठ अधिका-यांकडे आपोआप वळविली जाईल.- तक्रारीसाठी विहीत कालावधी किंवा तक्रार अन्य अधिका-यांकडे वळविण्याविषयी संबंधित अधिका-यांना कोणतेही स्वेच्छाधिकार नाहीत. त्यामुळे स्वत:ची तक्रार वेळेत सोडविणे बंधनकारक राहिल.

नागपूर लाईव्ह सिटी अॅपचे वैशिष्ट्ये

तक्रार नोंदविण्यासाठी अॅप डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण आवश्यक माहिती भरून ‘वन टाईम रजिस्ट्रेशन’ करणे आवश्यक आहे. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर कोणत्या नागरी सुविधा संदर्भातील तक्रारीकरीता संबंधित व्यक्तीला ‘साईन अप’ करावे लागेल.-आपल्या तक्रारीची सद्यस्थिती नागरिकांना पाहता येईल. याशिवाय आपल्याद्वारे नोंदविण्यात आलेल्या सर्व तक्रारीही पाहता येईल. सोबतच आपल्या तक्रारीसंदर्भात अभिप्रायही नोंदविता येईल. अॅपमध्ये नोंद झालेल्या सर्व तक्रारी आपोआप मनपाच्या संबंधित अधिकाऱयांकडे वर्ग केल्या जातील. संबंधित अधिका-यांकडून विहीत वेळेत तक्रार सोडविली जाईल. अॅप वापरण्यास सोपे असून नागरिकांच्या अनुकुलतेनुसार तयार करण्यात आला आहे. नागरिकांना आपल्या तक्रारीची सद्यस्थिती ‘सिटीजन डॅशबोर्ड’वर पाहता येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details