महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Azaan loudspeaker controversy : दोन मिनिटांच्या अजानसाठी मशिदींवरील लाऊडस्पीकरचा वाद उकरणे निरर्थक- मोहम्मद हाफीझुर रहेमान

जामा मशिदीचे अध्यक्ष ( Jama Masjid president ) मोहम्मद हाफीझुर रहेमान ( Mohammad Hafizur Rehman ) म्हणाले, की मुळात आमच्या धर्माची प्रार्थना करताना आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाहीत. केवळ दोन ते तीन मिनिटांच्या अजानसाठीच लाऊडस्पीकरचा उपयोग ( loudspeaker use in mosque ) केला जातो. त्यामुळे हा विनाकारण हा वाद उकरून काढणे निरर्थक असल्याचे ते म्हणाले आहेत. मशिदींवरील लाऊड स्पीकर ध्वनि प्रदूषणाच्या कक्षेत येत नसल्याचा दावासुद्धा त्यांनी केला आहे.

मोहम्मद हाफीझुर रहेमान
मोहम्मद हाफीझुर रहेमान

By

Published : Apr 7, 2022, 4:19 PM IST

Updated : Apr 7, 2022, 4:39 PM IST

नागपूर -मुस्लिम धर्माची प्रार्थना म्हणजेच अजान ही लाऊड स्पीकरच्या माध्यमातून केली जाते. मशिदींवरील असलेले लाऊड स्पीकर हे ध्वनिप्रदूषण करत असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून होतो आहे. यावर नागपूर येथील जामा मशिदीचे अध्यक्ष मोहम्मद हाफीझुर रहेमान यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

जामा मशिदीचे अध्यक्ष ( Jama Masjid president ) मोहम्मद हाफीझुर रहेमान ( Mohammad Hafizur Rehman ) म्हणाले, की मुळात आमच्या धर्माची प्रार्थना करताना आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाहीत. केवळ दोन ते तीन मिनिटांच्या अजानसाठीच लाऊडस्पीकरचा उपयोग ( loudspeaker use in mosque ) केला जातो. त्यामुळे हा विनाकारण हा वाद उकरून काढणे निरर्थक असल्याचे ते म्हणाले आहेत. मशिदींवरील लाऊड स्पीकर ध्वनि प्रदूषणाच्या कक्षेत येत नसल्याचा दावासुद्धा त्यांनी केला आहे.

मशिदींवरील लाऊडस्पीकरचा वाद उकरणे निरर्थक-

लाऊड स्पीकरवरून राज्यात राजकारण-मशिदीवरील लाऊड स्पीकरच्या माध्यमातून अजान केली जाते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर भाजपनेदेखील त्यांच्या या आरोपाला समर्थन दिले होते. तर काही पक्षांनी विरोध दर्शविला आहे. लाऊड स्पीकरवरून तुम्ही अजान कराल तर आम्ही हनुमान चालीसा वाचवू, अशी भूमिका मनसेने घेतल्यामुळे या विषयावरून राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील जामा मशिदीचे अध्यक्ष मोहम्मद हाफीझुर रहेमान यांनी मुस्लिम धर्माची भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा-Sanjay Raut on Azaan loudspeaker : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून अजानच्या लाऊड स्पीकरबाबत नोटीस- संजय राऊत यांची माहिती
हेही वाचा-INS Vikrant Fund Fraud : किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर पैसे खाल्ले.. अटक करण्याची शिवसैनिकांची मागणी

हेही वाचा-INS Vikrant Fund Fraud : किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर पैसे खाल्ले.. अटक करण्याची शिवसैनिकांची मागणी

Last Updated : Apr 7, 2022, 4:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details