नागपूर - केंद्रीय गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील मोठ्या १११ शहरांमधील जीवनमान सुलभता निर्देशांक २०२० (ईज ऑफ लीविंग इंडेक्स) आणि महानगरपालिका कामगिरी निर्देशांक जाहीर केले आहेत. या निर्देशांकामध्ये नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन यांनी मोठी भरारी मारली आहे. जीवनमान सुलभता निर्देशांकामध्ये नागपूर देशभरात २५ व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. मागील वर्षी २०१९ मध्ये नागपूरचा ३१ वा क्रमांक होता.
महानगरपालिका कामगिरी निर्देशांक यंदाच पहिल्यांदाच घेण्यात आला. त्यामध्ये नागपूर ३० व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून या निर्देशांकाची घोषणा केली.
जीवनमान सुलभता निर्देशांकात २५ व्या क्रमांकावर झेप नागपूरची देशात हेही वाचा-कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली, धारावीकरांची पुन्हा स्क्रिनींग सुरू
जीवनमान निर्देशांकामध्ये जीवनमान गुणवत्ता, आर्थिक क्षमता, सेवामधील सातत्य निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात आले. नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत नागरिकांचे मत नोंदविणे महत्त्वाचा भाग होता. तसेच महानगरपालिकाचे कारभार, सेवा, योजना, तंत्रज्ञान आणि वित्तीय व्यवस्थापनचे मूल्यमापन नगरपालिका कामगिरी निर्देशांकमध्ये करण्यात आली आहे. नागपुरच्या नागरिकांकडून महानगरपालिकेव्दारे दिल्या जाणाऱ्या सोयी व सुविधांच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिसादामुळे शहर १७ व्या क्रमांकावर आले आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या उपयोगात नागपूर ९ व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूर ८ व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.
हेही वाचा-मंत्र्याची अश्लिल सीडी व्हायरल करण्यासाठी ५ कोटींची डील; कुमारस्वामींचा आरोप
आणखी मेहनत घेणार- महापौर
नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यासाठी स्मार्ट सिटी टीमचे हार्दिक अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की प्रेरणा घेऊन आणखी मेहनत करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की, नागपूर हा देशाच्या ह्रदयस्थळी असलेले शहर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी भरीव योगदान केले आहे. मागीगल १५ वर्षांपासून मनपाच्या माध्यमातून नागपुरकरांना सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागपूर पुढच्या वर्षी सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी मी आशा बाळगतो.
नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध- आयुक्त
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी म्हणाले की, महानगरपालिकेच्या कामाचे नागरिकांव्दारे मूल्यमापन करणे आणि त्यामध्ये १७ वा क्रमांक येणे, ही मोठे यश आहे. नागपूर महाराष्ट्रातील मोठे शहर आहे. सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा नागरिकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागपूरने आपल्या गुणांकनामध्ये सुधारणा केली आहे. नागपूरच्या नागरिकांनी मनपा व स्मार्ट सिटीच्या माध्यमाने दिले जाणाऱ्या सेवेत १७ वा क्रमांक दिला आहे. यासाठी मी नागरिकांचे आभार व्यक्त करतो. पुढच्या वर्षी आम्ही आपले गुणांकन सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न करू, असेही त्यांनी म्हटले.