नागपूर -मोठ्या प्रमाणात वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या पाहता कडक निर्बंधांचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत कठोर निर्बंध असणार आहेत. यात सकाळी सात ते आठ पर्यंत काही दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. यात स्थानिक प्रशासन आदेश काढणार आहे. जे गोरगरीब लोकं आहेत, छोटे दुकानदार आहे, त्यांच्याही विचार केला जात आहे. लोकांचे जीव वाचवायचे आहेत, पण गरीब लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून याचाही विचार केला जात असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले. ते नागपुरात विभागीय कार्यालयात बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा -गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत, दुसऱ्या क्रमांकावर जयंत पाटील
यात पुढे बोलताना म्हणाले की सरकारी नियमावली स्पष्ट सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत जमावबंदीसह सेवा सुरू राहणार आहे. यात रात्री संचारबंदी असणार आहे. लोकांना गर्दी करू नये असे आवाहन केले जात आहे. हे लॉकडाऊन नसून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.