महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

नागपूर विभागातील पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे ही मतमोजणी होत आहे. सुरुवातीला टपली मतदानाची मोजणी होईल, त्यानंतर बॅलेट पेपरची मतमोजणी होणार आहे.

nagpur graduate constituency election result
नागपूर

By

Published : Dec 3, 2020, 8:39 AM IST

नागपूर - विभागात झालेल्या पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे ही मतमोजणी होत आहे. सुरुवातीला टपली मतदानाची मोजणी होईल, त्यानंतर बॅलेट पेपरची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या दृष्टीकोनातून संपूर्ण स्टेडियमला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आपला गड राखेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात..
पदवीधर निवडणुकीत एकूण दोन लाख सहा हजार मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६९.४१ टक्के इतकी आहेत तर ५६.६२ महिला मतदारांनी मतदान केले आहे. ही वाढलेली टक्केवारी आमच्या फायद्याची असल्याचा दावा सर्वच पक्षांनी केला आहे. आता मतमोजणी सुरू झाली असल्याने संध्याकाळपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. तसेच कोण बाजी मारणार हेदेखील सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details