नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर रेल्वे स्थानकाच्या ( Nagpur Railway Station ) बाहेर रेल्वेच्या डब्यात रेस्ट्रॉरंट सुरु केले आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच रेस्ट्रॉरंट आहे. ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ नावाने या रेस्ट्रॉरंटची उभारणी करण्यात आली ( Restaurant on Wheels ) आहे.
Restaurant on Wheels : नागपुरात रेल्वेच्या कोचमध्ये सुरु केले रेस्ट्रॉरंट.. खवय्यांची गर्दी - रेल्वेच्या कोचमध्ये सुरु केले रेस्ट्रॉरंट
रेल्वेच्या जुन्या कोचचा वापर करून नागपूरमध्ये एक अनोखे रेस्ट्रॉरंट सुरु करण्यात आले ( Restaurant on Wheels ) आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हे रेस्ट्रॉरंट सुरु केले ( Nagpur Railway Station ) आहे.
एएनआयने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. 'आम्हाला हे रेस्ट्रॉरंट आवडले आहे. ही एक नवीन संकल्पना आहे. आपण महाराजा एक्स्प्रेसमध्ये जेवत आहोत, असा भास होत आहे', सुनील अग्रवाल या ग्राहकाने सांगितले. एका खासगी कंपनीला हे रेस्ट्रॉरंट चालविण्यास देण्यात आले आहे.
रेस्टॉरंटमध्ये जुना कोच विकसित करण्यासाठी आम्ही निविदा काढल्या होत्या. हे रेस्ट्रॉरंट एका खासगी कंपनीमार्फत चालवले जात आहे. मला आशा आहे की, लोकांना ते आवडेल. चांगला प्रतिसाद मिळाल्यास आम्ही इतर जिल्ह्यातही अशी रेस्टॉरंट सुरू करू, अशी प्रतिक्रिया रेल्वेच्या नागपूर विभागाच्या डीआरएम ऋचा खरे यांनी दिली आहे.