महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूरचा 'कोरोना' रिकव्हरी रेट ९८ टक्के, शहरात सलग चौथ्या दिवशी शुन्य मृत्यू

शहरात 769 तर ग्रामीणमध्ये 33 रुग्ण सक्रिय असून जिल्ह्यात एकूण 802 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 794 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 66 हजार 937 जण हे कोरोनातून बरे झाले. यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 9019 वर जाऊन पोहोचली आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेंट हा 97.94 टक्क्यांवर वर असून रोज यात वाढ होत आहे.

nagpur districts corona recovery rate
नागपूरचा रिकव्हरी रेट ९८ टक्के

By

Published : Jun 22, 2021, 5:08 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील दुसरी लाट ओसरत असल्याचे दररोजच्या आढळून येणाऱ्या घटत्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. या कारणाने मृत रुग्णांची संख्याही कमी होत आहे. म्हणजेच मृत्यूदर कमी होत आहे. मागील आठ दिवसांनी प्रथमच आज ग्रामिण भागात एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा 97.94 टक्क्यांवर वर असून रोज यात वाढ होत आहे. परंतू जस-जसे निर्बंध शिथिल होत आहेत. तस-तशी बाजारात गर्दी वाढत आहे. यामुळे ही वाढती गर्दी धोक्याची ठरू नये म्हणून नियमाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 5 हजार 533 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 33 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. यात शहरी भागात 21 तर ग्रामीण भागात 11 बाधित रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये मागील आठ दिवसात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून शहरात चौथ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मागील 24 तासात 136 जणांपैकी शहरातील 99 तर ग्रामीणचे 37 जण कोरोना मुक्त झाले आहे. सक्रिय रूग्णांमध्ये 228 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 679 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.

सक्रिय रुग्णसंख्येत घट

शहरात 769 तर ग्रामीणमध्ये 33 रुग्ण सक्रिय असून जिल्ह्यात एकूण 802 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 794 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 66 हजार 937 जण हे कोरोनातून बरे झाले. यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 9019 वर जाऊन पोहोचली आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेंट हा 97.94 टक्क्यांवर वर असून रोज यात वाढ होत आहे.

विदर्भातील सहा पैकी दोन जिल्ह्यात चौघांचा कोरोनाने मृत्यू

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 340 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 70 नवीन बाधितांची नोंद झाली असून 4 जण हे कोरोनाने दगावले आहे. तेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली वर्धा या चारही जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद नाही. यात कोरोनाबाधितांच्या तुलेनेत 270 अधिकचे रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात नागपूरातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.6 टक्के, तर पूर्व विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होऊन 0.81 इतकी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details