नागपूर- ओमायक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटक राज्यात आढळल्यानंतर नागपूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
कर्नाटकानंतर महाराष्ट्रातही १० संशयित रुग्ण आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope on omicron ) यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगात होत असल्याने नागपूरच्या मेयो, मेडिकल आणि एम्स रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पांचे काम 10 दिवसांत पूर्ण करा, असे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा ( Prajakta Lavangare Verma direction for oxygen plant ) यांनी दिले आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनने खबरदारीचा म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आलेल्या अनुभवाच्या आधारे कामाला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा-Omicron Variant : नागपूर मनपाचा ओमायक्रॉन रोखण्यासाठी 'हा' फार्म्युला
या उपाययोजना सुरू-
लसीकरण हा एकमात्र उपाय असल्याने लसीकरणावर जोर दिला जात आहे. गेल्या तीन-चार दिवसांत नागपूर शहरात रेकॉर्ड ब्रेक ( Corona vaccination in Nagpur ) लसीकरण झाले आहे. विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची विमानतळावर चाचणी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत विदेश दौरा करून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी लागणार आहे. ज्यांनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.