महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur Crime : बंदुकधारी दरोडेखोरांचा चोरीचा प्रयत्न, सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू - Nagpur Police

कामठी येथील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Nagpur Crime ) असलेल्या एका फार्म हाऊसवर ( Farm House ) काही बंदूकधारी दरोडेखोरांनी हल्ला केला. लुटपाट आणि दहशत माजवण्यासाठी दरोडेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने या घटनेत फार्म हाऊसमधील कुणालाही दुखापत झाली नाही. काही वेळाने दरोडेखोरांनी तिथून पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Nagpur Crime
Nagpur Crime

By

Published : Feb 3, 2022, 7:57 PM IST

नागपूर -कामठी येथील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Nagpur Crime ) असलेल्या एका फार्म हाऊसवर काही बंदूकधारी दरोडेखोरांनी हल्ला केला. लुटपाट आणि दहशत माजवण्यासाठी दरोडेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या ( Gun Firing ). मात्र, सुदैवाने या घटनेत फार्म हाऊसमधील ( Farm House ) कुणालाही दुखापत झाली नाही. काही वेळाने दरोडेखोरांनी तिथून पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा ( Robbers ) शोध सुरू केला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर-जबलपूर महामार्गावरील आवंडी गावापासून एक किमी अंतरावर यशपाल शर्मा, या व्यक्तीचे शेतात घर आहे. ते फार्म हाऊसमध्ये एकटे राहतात. त्यामुळे आजूबाजूला शेतात काम करणारे मजूरही काम आटोपल्यानंतर त्यांच्याच फार्म हाऊसमध्ये ( Farm House ) मुक्काम करतात. रात्री उशिरा आठ ते दहा बंदूकधारी दरोडेखोर चेहरा झाकून त्यांच्या शेतात शिरले होते. यशपाल शर्मा यांच्या फार्म हाऊस बाहेर दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून फार्म हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही.

गोळीबाराच्या आवाजाने मजूर झाले जागे -फार्म हाऊस बाहेरील गोळीबाराचा आवाज ऐकून फार्म हाऊस मध्ये झोपलेले मजूर जागे झाले. नेमका आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी सर्व मजूर बाहेर आले. त्यांना पाहून दरोडेखोर त्यांच्या दिशेने धावू लागले. दरोडेखोर आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून मजूर फार्म हाऊसमध्ये जाऊन दार लावून घेतले. दरोडेखोरांनी दाराला लाथा मारून शिविगाळ केली त्यानंतर ते निघून गेले. त्यापूर्वी दरोडेखोरांनी फार्म हाऊस बाहेर उभ्या असलेल्या जीपच्या काचा फोडल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या ( CCTV ) आधारे पोलिसांनी ( Nagpur Police ) दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे..

हेही वाचा -Deceived Elderly in Nagpur : तोतया पोलिसांनी भीती दाखवून वृद्धांची केली फसवणूक; लाखोंचा ऐवज लंपास

ABOUT THE AUTHOR

...view details