नागपूर - शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलवारीचा धाक दाखवून एका कंपनीच्या व्यवस्थापकाकडून तीन लाख 20 हजार रुपये लुटले ( Manager Robbed Threatening Sword ) होते. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली ( Nagpur Crime News ) होती. त्याप्रकरणी तक्रार दाखल होताच तहसील पोलिसांनी अवघ्या 12 तासांत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या ( Tahsil Police Station Nagpur ) आहेत. राजू उर्फ गौतम भीमराव रामटेके आणि अशोक किसन पाटील, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधीबाग येथील सिद्धीविनायक इमारतीत गिरनार कार्गो एस्कॉर्ट सर्व्हिसचे कार्यालय आहे. कंपनीचे व्यवस्थापक ओमप्रकाश हे त्यांच्या कार्यालयात काम करत होते. तेव्हा दोन गुंड तलवार घेऊन कार्यालयात शिरले. त्यागुंडांनी व्यवस्थापकाला जबर मारहाण केली. त्यानंतर गुंडांनी तलवारीचा धाक दाखवत 3 लाख 20 हजार रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकाने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.