महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

nagpur crime : दगडाने ठेचून कुख्यात गमछू लांबटचा खून, सर्व आरोपी पसार - Gamchu Lambat murder news

वर्चस्वाच्या वादातून मंगळवारी रात्री पाच ते सात आरोपींनी संगनमत करून गमछूचा मार्ग अडवून धरला. त्यानंतर आरोपींनी गमछूवर धारधार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला. एवढेच नाही तर आरोपींनी गमछूचे डोके दगडांनी ठेचले.

गमछू लांबट खून
गमछू लांबट खून

By

Published : Sep 15, 2021, 5:05 PM IST

नागपूर - शहरातील जुनी शुक्रवारी परिसरात कुख्यात गुंड महेश उर्फ गमछू लांबटचा खून झाल्याची घटना घडली आहे. मृतक गमछूचा गुन्हेगारी क्षेत्रात वावर वाढला होता, ज्यामुळे त्याचे अनेक शत्रू झाले होते, वर्चस्वाच्या वादातून मंगळवारी रात्री पाच ते सात आरोपींनी संगनमत करून गमछूचा मार्ग अडवून धरला. त्यानंतर आरोपींनी गमछूवर धारधार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला. एवढेच नाही तर आरोपींनी गमछूचे डोके दगडांनी ठेचले. गमछू मृत झाल्याची खात्री पटताच सर्व आरोपी पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

वर्चस्ववादातून खून

गेल्या काही दिवसांपासून गमछू हा त्याच्या शत्रूंच्या निशाण्यावर होता. त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. काल रात्री गमछू कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी शुक्रवारी परिसरात आला होता. गमछू त्याच्या दुचाकीने जात असल्याची माहिती त्याच्या शत्रूंना मिळाली. त्यानंतर पाच ते सात आरोपींनी गमछूवर धारधार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला. घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सर्व आरोपी पळून गेले होते. गुन्हेगारी क्षेत्रात गमछू आपले वर्चस्व निर्माण करत होता. त्यातूनच त्याचा निर्घृण खून झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत ठोस निष्कर्षावर येता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

खून प्रकरणात गमछूची झाली होती निर्दोष मुक्तता

सप्टेंबर २०११मध्ये झालेल्या सुभाष शाहू हत्या प्रकरणात गमछूला अटक झाली होती. आरोपींनी साधूच्या वेशात येऊन सुभाष शाहूला प्रसाद म्हणून सायनाइटयुक्त पदार्थ खाऊन खून केला होता. या घटनेचा तब्बल दोन वर्ष तपास केल्यानंतरदेखील पोलिसांना या प्रकरणातील आरोपी सापडले नव्हते. तत्कालीन पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी गमछू आणि लकी खानला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने गमछूची निर्दोष मुक्तता केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details