महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Recce of RSS Hq : नागपूर पोलिसांनी श्रीनगरला जाऊन 'त्या' दहशतवाद्याची केली चौकशी - संघ मुख्यालयाची दहशतवाद्यांकडून रेकी

नागपुरातील संघ मुख्यालय (RSS Headquarters) हे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) रडावर असल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय तरुण हा नागपूरच्या संवेदनशील भागाची रेकी (Recce in Nagpur) करून परत गेला. त्याबाबतची माहिती घेण्यासाठी नागपूर क्राईम ब्रांचचे (Nagpur Crime Branch) वरिष्ठ अधिकारी हे डिसेंबरच्या शेवटी श्रीनगरला जाऊन आले आहेत.

rss
संघ मुख्यालय नागपूर

By

Published : Jan 9, 2022, 1:38 AM IST

नागपूर - नागपुरातील संघ मुख्यालय (RSS Headquarters) हे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) रडावर असल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय तरुण हा नागपूरच्या संवेदनशील भागाची रेकी (Recce in Nagpur) करून परत गेला. पण त्याने नेमक्या कुठल्या भागाची रेकी केली, या सर्व बाबींची माहिती घेण्यासाठी नागपूर क्राईम ब्रांचचे (Nagpur Crime Branch) वरिष्ठ अधिकारी हे डिसेंबरच्या शेवटी श्रीनगरला जाऊन आले आहेत. त्यानंतरच यूएपीए (unlawful activities prevention act) अंतर्गत गुन्हा दाखल करत संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

  • नागपूरच्या संवेदनशील भागात केली रेकी -

नागपूरच्या संवेदनशील भागात दहशतवादी संघटनेशी जुडलेला 26 वर्षीय तरुण हा जुलै 2021 मध्ये नागपुरात आला होता. त्याने नागपूरच्या विविध संवेदनशील भागाची रेकी करत माहिती गोळा करून परतसुद्धा गेला. दरम्यान, दोन दिवस सिताबर्डी परिसरात तो एका लॉजवर थांबला होता. त्यावेळी त्याने नागपूरच्या संघ मुख्यालय भागात रेकी केली. पण त्याठिकाणी असलेल्या सुरक्षा बंदोबस्तामुळे पाहिजे ती माहिती गोळा करु शकला नसल्याची माहिती समोर येत आहे.

  • हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात रेकी -

तसेच रेशीमबाग भागातील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात मात्र या युवकाने रेकी करून काही फोटोग्राफस काढले आहेत. नागपुरात मुक्कामी असताना त्याला लॉजीस्टिक हँडलिंगसाठी कोणी मदत केली? याचा तपास सध्या नागपूर क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. यात तो कुठल्या भागात गेला यासर्व बाबींची माहिती घेऊन पुष्टी करण्याचे काम पोलीस करत आहेत.

  • श्रीनगर पोलिसांनी त्या तरुणाला केली अटक -

दरम्यान, श्रीनगरच्या पाममपोरं पोलिसांनी त्या दहशतवाद्याला अटक केली होती, त्यावेळी त्याच्याकडून हॅन्डग्रेनेड अन्य साहित्य जप्त केले आहे. त्यानंतर चौकशी दरम्यान तो जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर संघ मुख्यालय, दिल्ली पोलीस मुख्यालय यासह आणखी काही संवेदनशील ठिकाणी तरुणाने रेकी केल्याची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे.

हा 26 वर्षीय तरुण कॉलेज स्टुडंट असून, अशाच पद्धतीने देशभरातील चार ते पाच संवेदनशील भागाची रेकी करून माहिती गोळा करण्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून त्या तरुणाला देण्यात आली होती. यात काही फोटो, व्हिडिओ त्यांने जैश ए मोहम्मदला पाठवले असून, यात संघ मुख्यालयासमोर असलेल्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामुळे काही माहिती गोळा करण्यास अपयशी ठरल्याची माहिती समोर येत आहे. पण त्याने रेकी केली हे स्पष्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details