नागपूर - उपराजधानी नागपूर शहराला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. निलेश भरणे यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपायोजना म्हणून आजपासून(बुधवार) ३१ ऑगस्ट पर्यंत पोलीस आयुक्त कार्यालय सामान्य जनतेसाठी बंद ठेवले जाणार आहे.
नागपूर शहरातील अनेक शासकीय कार्यालयात कोरोनाची एन्ट्री झालेली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्यालय आठ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यानंतर आता पोलीस आयुक्त कार्यालयात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आयुक्तालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने बुधवारी हे संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज केले जाणार आहे. मात्र ३१ ऑगस्ट पर्यंत सामान्य जनतेला कार्यालयात प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कोरोनाबाधित; पोलीस आयुक्तालय ३१ ऑगस्ट पर्यंत बंद
शहरातील अनेक शासकीय कार्यालयात कोरोनाची एन्ट्री झालेली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्यालय आठ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यानंतर आता पोलीस आयुक्त कार्यालयात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आयुक्तालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने बुधवारी हे संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज केले जाणार आहे. मात्र ३१ ऑगस्ट पर्यंत सामान्य जनतेला कार्यालयात प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
नागपूर पोलीस आयुक्तालय
विशेष म्हणजे मंगळवारीच महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे हेही कोरोना बाधित आढळले होते. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त भरणे यांना देखील कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे नागपुरात आता दोन वरिष्ठ अधिकारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी नागपुरात १०७१ जण कोरोनाबाधित आढळले, तर ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.