महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू - विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

महानगरपालिका संचालित इंदिरा गांधी रुग्णालयासमोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे गर्ल्स हॉस्टेल, गांधी नगर आणि पांचपावली स्त्री रुग्णालय, पांचपावली येथे विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेसाठी मोठा उत्साह दिसला.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू

By

Published : Jun 4, 2021, 11:55 AM IST

Updated : Jun 4, 2021, 12:05 PM IST

नागपूर- शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे परदेशात शिक्षणासाठी जात असलेल्या १८ वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी नागपूर महानगरपालिकेकडून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ इंदिरा गांधी रुग्णालय येथे करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यावेळी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू

महानगरपालिका संचालित इंदिरा गांधी रुग्णालयासमोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे गर्ल्स हॉस्टेल, गांधी नगर आणि पांचपावली स्त्री रुग्णालय, पांचपावली येथे विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेसाठी मोठा उत्साह दिसला.

परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक आहे आणि सध्या महाराष्ट्रात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याशी याबद्दल चर्चा केली. आयुक्तांनी या विषयाची गंभीरता बघून हे लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपुरात साधारणतः २०० विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. इंदिरा गांधी रुग्णालय येथे काही विद्यार्थांना पहिली लस देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू
दोन डोस दरम्यानचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न करू-महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की सध्याच्या नियमानुसार लसीच्या दोन डोसमध्ये कमीत कमी ८४ दिवसाचा कालावधी असायला पाहिजे तरीपण विद्यार्थ्यांना लवकरात-लवकर दुसरी लस मिळायला पाहिजे, यासाठी शासनासोबत पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी सांगितले की नागपूरमधील बरेच विद्यार्थी परदेशात शिक्षण घेतात आणि त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर लसीचे दोन्ही डोस मिळाले तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी परदेशात जाता येईल.
Last Updated : Jun 4, 2021, 12:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details