नागपूर - गणेशोत्सवाला Ganesh Festival Nagpur 22 सुरुवात झाली असून उद्या दीड दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन Ganesh Idol Immersion केले जाईल. यावर्षी नागपूर शहरातील एकाही नदी, तलावावर बाप्पाची मूर्ती विसर्जित Ganesh idol immersion in artificial ponds करता येणार नाही. नैसर्गिक जलाशयांमध्ये विसर्जनासाठी मनाई Ganesh idol immersion Ban In Lake And River करण्याचे आदेश नागपूर महापालिकेने Nagpur Corporation या महिन्याच्या सुरुवातीला दिले होते. त्यासंदर्भात राज्य सरकारने State Government एक धोरण तयार केले. ते धोरण मुंबई उच्च न्यायालयाच्या Mumbai High Court Nagpur Bench नागपूर खंडपीठाने स्वीकारले आहे. या विषयी सुनावणी करण्यासाठी न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली होती.
नैसर्गिक पद्धतीने तयार होणाऱ्या मूर्तींच्या विक्रीलाच परवानगीगणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने State Government एक धोरण तयार केले आहे. न्यायालयाने Mumbai High Court Nagpur Bench स्वतःहून या संदर्भात याचिका दाखल करून घेतल्यानंतर राज्य सरकारकडून मूर्ती विसर्जन संदर्भातील धोरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर Mumbai High Court Nagpur Bench मांडले. धोरणानुसार राज्यात नैसर्गिक पद्धतीने तयार होतील आणि पूर्णपणे नष्ट होणाऱ्या मूर्तींच्या विक्रीला परवानगी दिली जाईल. या संदर्भात राज्य सरकार State Government येत्या काही महिन्यांत कायमस्वरूपी धोरण तयार करणार आहे. या प्रकरणातील सर्व पक्षकारांना कायमस्वरूपी धोरणासाठी आपले मत देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने High Court दिले आहेत.