नागपूर - कोरोनाबाबतीत नागपूरची स्थिती आतासुद्धा नियंत्रणात आहे असे म्हणता येणार नसल्याचे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. कोविडचे रुग्ण वाढत असतानासुद्धा लोकं नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळं हिच परिस्थिती कायम राहिली तर नागपुरात लॉकडाऊन नाही तर कडक कर्फ्यू लावावा लागेल, असे देखील ते म्हणाले आहेत.
'नागरिक बेजबाबदारपणे वागत राहिले तर नागपुरात कोरोना रुग्ण वाढतील' - तुकाराम मुंढे ऑन कोरोना
मी स्वतः गेले काही दिवस बाजारात पाहणी करत असून, दोन तासात चार लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
!['नागरिक बेजबाबदारपणे वागत राहिले तर नागपुरात कोरोना रुग्ण वाढतील' tukaram mundhe](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8129603-787-8129603-1595421553163.jpg)
अनलॉक सुरू झाल्यापासून नागपुरात कोरोना रुग्ण आणि मृत्युचे प्रमाण वाढतच आहे. नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत, नियम पाळले जात नाहीत. अनेक जण कोविड सदृश्य लक्षणं असलेले रुग्ण आजाराची माहिती ही लपवत आहेत, त्यामुळे मृत्यू संख्या वाढतच आहे. शिवाय नागरिक बाहेर फिरताना अटीशर्तीचे पालन करत नसल्याचे देखील आढळून येत आहेत. शहरात परवानगी नसताना ऑटो रिक्षा सुरू आहेत. लोकांनी नियम पाळले नाही तर स्थिती आणखी बिघडेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मी स्वतः गेले काही दिवस बाजारात पाहणी करत असून, दोन तासात चार लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
आज ज्या गतीने नागपुरात कोरोना रुग्ण वाढत आहेत, हीच परिस्थिती कायम राहिली तर नागपुरात १० हजार पेक्षा जास्त रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही, असे सांगत नागपुरात लॉकडाऊन करायचे असल्यास १४ ते १५ दिवसांचा करावा लागेल, सोबत कर्फ्यूची कठोरता ही असेल. मात्र, लॉकडाऊन करण्यापूर्वी २-३ दिवस आधी लोकांना कळवण्यात येईल, असेही मुंढे म्हणाले.