नागपूर- 'आपली बस सेवा' ( Apali Bus Seva conductors strike ) वाहकांच्या वेतनास विलंब झाल्याने अचानक कर्मचाऱ्यांनी सकाळी बस संप सुरू केला. पण हा संप काही तासातच मागे घेण्यात आल्याचा दावा मनपाचे परिवहन सभापती बंटी कुकडे ( Bunty Kukade on conductors strike ) यांनी केला आहे. नागपूर मनपाकडून पैसे दिले असताना कंत्राटददाराकडून वेतनास विलंब झाल्याने संप पुकारला होता.
युनिटी सिक्युरिटी फोर्स ( Unity Security Force Nagpur ) या खासगी कंपनीच्या पगार असलेले 1800 वाहकांनी सकाळी अचानक संप पुकारला. त्यामुळे बस सेवा सकाळी वाहतूक सेवा ठप्प झाली. याचा फटका ह सर्वसामान्य प्रवाशांना बसला. यामुळे या वाहतूक सेवेचा वापर करणारे अनेक जण आपल्या दैनदिन कामावर वेळेवर पोहचू शकले नाहीत. 16 तारखेला बँकेच्या खात्यात कंपनीने पैसे जमा केले होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे हे पैसे वाहकांच्या खात्यात जमा होऊ शकले नाही. पण बँका सुरू होताच कामगारांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले ( Nagpur Bus conductors issue ) आहे. त्यामुळे वाहकांनी संप मागे घेतल्याची माहिती परिवहन विभागाचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन वेळत झाल्याने संप मागे घेतला. पण कंत्राटदाराच्या चुकीने प्रकार घडल्याने प्रवाशांना फटका बसला आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करू असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा-Kavya Thapar Arrested : महिला पोलिसांशी गैरवर्तन भोवले, अभिनेत्री काव्या थापरला अटक
या संपामागे शिवसेना प्राणित कामगार संघटनेचे अडीच लोक....
संपामागे भारतीय कामगार सेनेचे काही लोक कारणीभूत असल्याचा आरोप परिवहन विभागाचे सभापती कुकडे यांनी केला आहे. भारतीय कामगार सेनेचे 'अडीच लोक' वारंवार आपली बस सेवेतील वाहक आणि चालकांना चिथावणी देत असतात. ही कामगार संघटना शिवसेना प्रणित संघटनेची असल्याचा आरोप बंटी कुकडे यांनी केला. यापूर्वी नागपुरात झालेल्या संपामागे याच सेनेची भूमिका असल्याचे आरोप त्यांनी केला.