नागपूर -राज्यात सध्या पदवीधर निवडणूकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीचा प्रचार थांबला असला तरी समाज माध्यमातून प्रचार सुरूच आहे. असा प्रचार करणाऱ्यांवर सायबर सेलच्या माध्यातून करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. पदवीधर निवडणुकीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रशासनाकडून प्रत्येक बाबींवर लक्ष ठेण्यात येत असल्याचेही ठाकरे म्हणाले.
पदवीधर निवडणुकीत अपप्रचार करून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत. पदवीधर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गेल्या काही दिवसांपासून विविध अपप्रचाराच्या घटना समोर आल्या आहेत. समाज माध्यमातून बनावट पोस्ट तयार करून पसरविल्या जात होत्या. त्यांच्यावर सायबर सेलकडून कारवाईसुध्दा करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक पार पडेपर्यंत अशा घटना पुन्हा घडू नये व आचारसंहितेचा भंग होऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हेही वाचा-पदवीधर निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; मतदानाला काही तासच शिल्लक