महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिंताजनक : नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचे अर्धशतक पूर्ण..४८ तासांत आढळले २५ रुग्ण - मेयो रुग्णालय नागपूर

कोरोना विषाणूचा कहर देशात आणि राज्यात सुरू आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ आता नागपुरातही आता कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे.

meyo hospital nagpur
मेयो रुग्णालय नागपूर

By

Published : Apr 14, 2020, 10:13 AM IST

Updated : Apr 14, 2020, 12:25 PM IST

नागपूर - कोरोना विषाणूचा कहर देशात आणि राज्यात सुरू आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ आता नागपुरातही आता कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. मागील केवळ 48 तासांच्या कालावधीत नागपूर शहरात 25 पेक्षा जास्त रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा आता 50 वर जाऊन पोहचला आहे.

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचे अर्धशतक पूर्ण..४८ तासांत आढळले २५ रुग्ण

हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमध्ये आदिवासी शिक्षितांपेक्षाही समजूतदार..

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिकी मरकजच्या कार्यक्रमातून परत आलेले 135 लोकांचे नमुने आता तपासायला घेतले आहेत. सुरुवातीला केवळ एकाच प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी केली जात होता. मात्र, आता आणखी 3 प्रयोगशाळांची भर पडल्याने कोरोना चाचणीचा वेग वाढला आहे.

Last Updated : Apr 14, 2020, 12:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details