नागपूर - कोणी कितीही प्रयत्न केला तरी समृद्धी महामार्गाच्या कामातून माझे नाव मिटवता येणार नाही. (Fadnavis On Samrudhi Highway) परंतु, मला याचा आनंद आहे, की जे लोक मोठ्या प्रमाणात विरोध करत होते, तेच आता उदघाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणत मुख्यमंत्री यांचे नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
Fadnavis On Samrudhi Highway : समृद्धी महामार्गाच्या कामातून माझे नाव मिटवता येणार नाही -फडणवीस - work of Samrudhi Highway
कितीही प्रयत्न केला तरी समृद्धी महामार्गाच्या कामातून माझे नाव मिटवता येणार नाही. (work of Samrudhi Highway) परंतु, मला याचा आनंद आहे, की जे लोक मोठ्या प्रमाणात विरोध करत होते, तेच आता उदघाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणत मुख्यमंत्री यांचे नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
रस्त्याचे महत्व कमी होईल - समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे यासाठी मला आनंदच आहे पण त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे घाईघाईत उद्घाटन करण्यापेक्षा ते पूर्णत्वास नेऊन त्याचे उद्घाटन केले, तर अधिक सोयीचे होईल. पण उदघाटन करून रस्ता सुरू केला तरी काम सुरू होऊ शकेल. मात्र, तसे केल्यास त्या रस्त्याचे महत्व कमी होईल असही फडणवीस म्हणाले आहेत.
हेही वाचा -Use of horses for farming : बैलचं नाही मिळाले! मग काय?, घोडेचं जुंपले औताला